आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Xclusive: Cannesमध्ये ब्लू पास नसल्याने गेटवरच झाली होती ऐश्वर्याची अडवणूक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडे - जज्बाचे सहनिर्माते सचिन जोशी, दिग्दर्शक संजय गुप्ता, अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि अन्य एक मेंबर)
एन्टरटेन्मेंट डेस्कः माजी जगतसुंदरी आणि बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन गेल्या 14 वर्षांपासून कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होत आहे. मात्र यावर्षी तिच्यासोबत एक अंचबित करणारी गोष्ट घडली आहे. 17 मे रोजी रेड कार्पेटवर अवतरल्यानंतर दोन दिवसांनी ऐश्वर्या आपल्या आगामी 'जज्बा' या सिनेमाच्या प्रमोशनसाठी इंडिया पॅवेलियन इव्हेंटमध्ये पोहोचली. मात्र येथे तिला प्रवेश नाकारण्यात आला. या इव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी ज्या ब्लू पासची गरज होती, तो पास तिच्याकडे नव्हता. एकीकडे जगभरातील मीडिया हातात कॅमेरा घेऊन तिची प्रतिक्षा करत होते, तर दुसरीकडे ऑस्कर डे ला रेंटा गाऊनमध्ये अवतरलेली ऐश्वर्या एन्ट्री वाट बघत उभी होती.
सिनेमाचे दिग्दर्शक संजय गुप्ता आणि सहनिर्माते सचिन जोशीसुद्धा तेथे उपस्थित होते. मात्र ते ऐश्वर्याची कोणतीही मदत करु शकले नाहीत. जवळजवळ 20 मिनिटांनी भारतीय दुतावासचे प्रोटोकॉल ऑफिसर सत्य पॉल सिंह आणि FICCI (Federation of Indian Chambers of Commerce and Industry) चे प्रतिनिधी यांनी तेथील ऑथोरिटिला विनंती केली, की ऐश्वर्या ग्लोबल सेलिब्रिटी आहे, रिप्रेजेन्टेटिव्ह आहे. तिची अशाप्रकारे अडवणूक व्हायला नको. FICCI आणि I&B यांनी संयुक्तरित्या इंडिया पॅवेलियनचा इव्हेंट आयोजित केला होता.
वर्ल्ड न्यूड नेटवर्कचे मॅनेजिंग डायरेक्टर सतीश रेड्डी यांनी याविषयी खुलासा केला, "सुरक्षा अधिका-यांनी ऐश्वर्यालाला इंडिया पॅवेलियनमध्ये प्रवेश घेण्यापासून अडवले होते. कारण तिच्याकडे ब्लू पास नव्हता. याच कारणामुळे जज्बाच्या टीमला गेटवर 20 मिनिटे प्रतिक्षा करवी लागली होती. नंतर सत्य पॉल सिंह आणि FCCIच्या प्रतिनिधींनी त्यांची मदत केली."
सत्य पॉल यांनी वर्ल्ड न्यूड नेटवर्कला एक ईमेल केला होता. त्याची एक प्रत Divyamarathi.comकडे आहे. त्यामध्ये लिहिले आहे, "ऐश्वर्या ज्या कारमध्ये बसली होती, त्यावर ब्लू स्टीकर लावलेले नव्हते. याचकारणामुळे तिच्या कारला गेटजवळच अडवण्यात आले. जेव्हा आम्हाला याची माहिती मिळाली मिळाली, तेव्हा आम्ही इंडिया पॅवेलियनच्या मुख्य सुरक्षा अधिकारीसोबत बातचित केली आणि सांगितले, की ऐश्वर्या एक ग्लोबल सेलिब्रिटी आहे. 20 मिनिटे प्रतिक्षा केल्यानंतर त्यांनी तिला परवानगी देण्यात आली. मात्र त्यासाठी तब्बल एक तास आम्ही हैराण झालो होतो."
मात्र ऐश्वर्याच्या पीआर पर्सनने या बातमीचा इंकार केला आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार, "हे खरे नाहीये. आमचे बॉडीगार्ड फ्रँक यांनी सकाळीच FICCI चे समीर कुमार यांच्यासोबत जाऊन परवानगी घेतली होती. ही अफवा कशी उडाली, ही आश्चर्याची बाब आहे."
FICCI चे डिप्टी डायरेक्टर समीर कुमार यांचे याविषयी काही वेगळेच म्हणणे आहे. ते म्हणतात, "ही मोठी गोष्ट नाहीये. नियमांनुसार ब्लू पास असणे गरजेचे होते. कान्समध्ये सुरक्षा अधिका-यांशी बातचित केल्यानंतर त्यांनी आम्हाला को-ऑपरेट केले. आम्हाला फार काळ प्रतिक्षा करावी लागली नाही."
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, कान्समध्ये क्लिक झालेली ऐश्वर्याची छायाचित्रे..