Home »News» Rekha Get Ready Easily To Work In Kamastra

Birthday Special: 'कामसूत्र'साठीही रेखाने बिनधास्त दिला होता होकार, वाचा रंजक Facts

दिव्य मराठी वेब टीम | Oct 10, 2017, 15:27 PM IST

एंटरटेनमेंट डेस्क - 10 ऑक्टोबर 1954 ला जन्मलेली रेखा आज 63 वर्षांची जाली आहे. रेखाचे वडील तमिळ अॅक्टर जेमिनी गणेशन आणि आई तेलुगू अॅक्ट्रेस पुष्पावल्ली होते. रेखाने जेव्हा चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले तेव्हा कोणालाही असे वाटले नव्हते की, ती बॉलिवूडच्या आघाडीच्या अॅक्ट्रेसेसपैकी एक बनेल आणि सर्वांत सुंदर अॅक्ट्रेस म्हणून ओळख मिळवेल. कारण त्यावेळी रेखा जाड आणि दिसायलाही फारच साधारण होती. पण वेळेबरोबर स्वतःमध्ये बदल घडवून आणत तिने यश मिळवले आहे.

रेखाने अनेक चित्रपटांत काम केले आहे. पण तिने केलेल्या एका चित्रपटामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. 'कामसूत्रः अ टेल ऑफ लव्ह (1996)' मध्ये काम करून रेखाने सर्वांना धक्का दिला होता. रेखा या चित्रपटामध्ये प्रेम करण्याचे धडे देणारी शिक्षिका बनली होती. रेखाने या चित्रपटाला होकार दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. तिच्याबाबत विविध प्रकारच्या चर्चाही सुरू झाल्या होत्या. पण चित्रपट रिलीज झाला आणि त्यातील काम पाहून सर्वांचे तोंड बंद झाले होते.

पुढील स्लाइड्सवर वाचा, रेखाबाबत काही रंजक माहिती...

Next Article

Recommended