आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लता आणि बिग बींनंतर रेखाला मिळाला तिसरा यश चोप्रा मेमोरिअल अवॉर्ड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडून सी विद्यासागर रावकडून पुरस्कार घेताना रेखा, उजवीकडे रणवीर सिंहसोबत रेखा - Divya Marathi
डावीकडून सी विद्यासागर रावकडून पुरस्कार घेताना रेखा, उजवीकडे रणवीर सिंहसोबत रेखा
मुंबई- एव्हरग्रीन अभिनेत्री रेखाला आज (26 जानेवारी) मुंबईमध्ये तिस-या यश चोप्रा मेमोरिअल अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्राचा राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी रेखाला सिनेसृष्टीतील योगदानासाठी या पुरस्काराने गौरवले. यादरम्यान येथे बॉलिवूडचे अनेक प्रसिध्द सेलेब्स उपस्थित होते. यामध्ये सुभाष घई, जया प्रदा, पामेला चोप्रा, अनुष्का रंजन, बोनी कपूर, श्रीदेवी, पूनम ढिल्लन आणि रणवीर सिंहसारखे अनेक स्टार्स सामील झाले होते.
यावेळी रेखा म्हणाल्या, 'हा पुरस्कार मला आठवून देतो, की 'पडदा अजून पडला नाहीये.' हा पुरस्कार मला आठवून देतो, की पूर्वीपेक्षा आणखी चांगले करायचे आहे.'
लता दीदींना मिळाला होता पहिला 'YCMA अवॉर्ड'
मागील तीन वर्षांपासून नॅशनल यश चोप्रा मेमोरिअल अवॉर्ड बॉलिवू़डमध्ये उल्लेखनीय योगदानासाठी देणा-यांना दिला जातो. यामध्ये पहिला नॅशनल यश चोप्रा मेमोरिअल अवॉर्ड गानकोकिळा लता मंगेशकर यांना देण्यात आला होता आणि दुसरा अमिताभ बच्चन यांनी नावी केला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या इव्हेंटचे खास फोटो...