आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर सस्पेन्स संपला.... 'सुलतान'मध्ये अनुष्का करणार सलमानसोबत रोमान्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : सलमान खान स्टारर 'सुलतान' या सिनेमात कोणत्या अभिनेत्रीची वर्णी लागणार याविषयीचा सस्पेन्स अखेर संपला आहे. कारण 'सुलतान' सलमानला त्याची पडद्यावरची बेगम गवसली आहे. या सिनेमात अभिनेत्री अनुष्का शर्मा सलमान खानसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. ‘सुलतान’ सिनेमाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवर याबाबतची माहिती देण्यात आली आहे. सलमान आणि अनुष्काचे एक छायाचित्रे पोस्ट करुन ''Meet Sultan’s Leading Lady! #SultanLeadingLady pic.'' असे ट्विट करण्यात आले आहे.
दिग्दर्शक अली अब्बास जफर यांच्या ‘सुलतान’ या सिनेमात सलमान खान 40 वर्षांच्या हरियाणी पैलवानाची भूमिका साकारत आहे. आदित्य चोप्रा या सिनेमा निर्माता आहे. यावर्षी ‘ईद’च्या मुहूर्तावर हा सिनेमा प्रदर्शित होणार असून याच दिवशी शाहरुख खानचा ‘रईस’ही रिलीज होणार आहे.
विशेष म्हणजे सिनेमासह अनुष्का शर्मा ही बॉलिवूडमधील तिन्ही ‘खान’ सोबत काम करणारी अभिनेत्री बनली आहे. याआधी तिने शाहरुख खानसोबत ‘रब ने बना दी जोडी’ आणि ‘जब तक है जान’मध्ये काम केले. तर आमीर खानसह 'पीके'मध्ये तिने प्रमुख भूमिका साकारली आहे. आता ती सलमान खानसोबत ‘सुलतान’मध्ये काम करणार आहे.
पुढील स्लाईडमध्ये पाहा, अनुष्का शर्माने केलेले ट्विट...
बातम्या आणखी आहेत...