आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Reveled Randeep Hooda\'s Look Of Main Aur Charles

Xclusive : हा आहे सिल्व्हर स्क्रिनवरचा कुख्यात आंतरराष्ट्रीय गुंड चार्ल्स शोभराज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रणदीप हूडा
आंतरराष्ट्रीय गुन्हेगार चार्ल्स शोभराजवर बनलेल्या ‘मैं और चार्ल्स’ ह्या सिनेमातला अभिनेता रणदीप हूडाचा हा लूक divyamarathi.comच्या हाती लागला आहे. प्रवल रमन लिखीत-दिग्दर्शित ‘मैं और चार्ल्स’ हा चित्रपट येत्या ३० ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. ह्या सिनेमात चार्ल्स शोभराजच्या भूमिकेत रणदीप हूडा दिसणार आहे.
‘बिकनी किलर’ म्हणून प्रसिध्द असलेला चार्ल्स शोभराज हा एका pg3 व्यक्तिसारखं जीवन जागायचा. त्याला श्रीमंतीचा सोस होता. आणि त्याच्या ह्या लालसेपोटीच त्याने अनेक पर्यंटकांच्या आणि श्रीमंत व्यक्तींच्या हत्त्या केल्या. सत्तरच्या दशकातल्या ह्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारावर ‘मैं और चार्ल्स’ हा चित्रपट आधारित आहे. त्यामूळे रणदीप हूडाचा चित्रपटातला लूक सुध्दा तशाच लाइफस्टाइलचा आहे.
चित्रपटाचे चित्रीकरण गोवा, बॅंकॉक, पट्टाया, दिल्ली, मुंबई, उदयपूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी झाले आहे. त्यातला गोव्यातल्या चित्रीकरणातला चार्ल्सचा हा लूक आहे.
गोव्यामध्ये सुट्टी एन्जॉय करण्यासाठी आलेल्या पर्यटकांना फसवण्याच्या तयारीत असलेला चार्ल्स ह्या फोटांवरून दिसतोय. एका फोटोत स्विमवेअर घातलेला, तर दुस-या फोटोत
गोव्याच्या रिलॅक्स मूडमधला, तर दोन फोटोंमध्ये सत्तरीच्या दशकातल्या पेजथ्री व्यक्तिसारखे उंची सूट घातलेला रणदीप हूडा गोव्यात वावरताना दिसतो आहे.
रणदीप हूडासोबत, रिचा चड्ढा, आदिल हुसैन आणि टिस्का चोप्रा ह्या सिनेमात दिसणार आहेत.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, चार्ल्स शोभराजच्या लूकमधला रणदीप हूडा