आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऋषी कपूर यांची जीभ घसरली, पत्रकाराला म्हणाले 'स्टुपिड'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- अभिनेते ऋषी कपूर)
मुंबई- मागील दिवसांत रणबीर कपूरसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असलेली अभिनेत्री कतरिना कैफसाठी ऋषी कपूर यांनी शनिवारी (11 एप्रिल) डिनरचे आयोजन केले होते. जेव्हा एका महिला पत्रकाराने डिनरमध्ये कतरिनाच्या उपस्थितीवर प्रश्न विचारला तेव्हा ऋषी कपूर मात्र चांगलेच भडकले. ऋषी कपूर म्हणाले, 'मला एवढेच माहित आहे, की मी येथे का आल आहे. तुम्ही मला असे प्रश्न का विचारताय, मला हे आवडत नाही.'
एवढेच नव्हे ऋषी कपूर यांनी जातानी महिला पत्रकाराला स्टुपिड आणि इडियटसुध्दा म्हटले. त्यानंतर म्हणाले, 'मुर्खासारखे प्रश्न विचारता आणि स्वत:ला पत्रकार म्हणता.'
ऋषी कपूर यांची नाराजी रणबीर आणि कतरिनाच्या नात्यावर काय परिणाम करते, हे पाहणे रंजक ठरणार आहे.