आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rishi Kapoor And Many More Celebs Support To Kiku Sharda

\'पलक\'च्या समर्थनार्थ ऋषी कपूर उतरले मैदानात, या सेलेब्सनेही दर्शवला पाठिंबा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो- किकु शारदा, ऋषी कपूर, टि्ंवकल खन्ना, सोनाक्षी सिन्हा - Divya Marathi
फाईल फोटो- किकु शारदा, ऋषी कपूर, टि्ंवकल खन्ना, सोनाक्षी सिन्हा
'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' या कॉमेडी शोमध्ये 'पलक'ची भूमिका साकारणा-या किकु शारदाला डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहीमची खिल्ली उडवल्याच्या आरोपात मुंबईतून पोलिसांनी अटक केली होती. त्याला कॅथलच्या (हरियाणा) तुरुंगात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती, मात्र नंतर त्याला 1 लाखांत जामिन मंजूर झाला.
किकुच्या समर्थनासाठी अभिनेते ऋषी कपूर मैदानात उतरले आहेत. त्यांनी गुरमीत राम रहीम यांच्या चांगलाच समाचार घेतला. त्यांनी एक टि्वट करून म्हटले, 'See this picture!I would like to play this rockstar in a film. Let me see who puts me behind bars? Go Kiku Sharda!'
ऋषी कपूरच नव्हे तर सोनाक्षी सिन्हा, टि्ंवकल खन्ना, वीर दास, कपिल शर्मा, राजू श्रीवास्तव, सोनू सुदसह अनेक कलाकारांनी किकुला पाठिंबा दिला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा किकुच्या समर्थनात कलाकारांनी केलेले टि्वट्स...