आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rishi Kapoor And Other Celebs Support Sunny Leone After \'Offensive\' Interview

इंटरव्ह्यूमध्ये अँकरने केला सनीचा पाणउतारा, सोशल साईटसवर भडकले सेलिब्रिटी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटोः सनी लिओन - Divya Marathi
फाइल फोटोः सनी लिओन

मुंबई- सध्या 'मस्तीजादे' या सिनेमाच्या प्रमोशन बिझी असलेल्या सनी लिओनने अलीकडेच एका प्रसिद्ध टीव्ही चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत सनीला असे काही खासगी प्रश्न विचारण्यात आलेत, जे बघून केवळ प्रेक्षकच नव्हे तर बॉलिवूड कलाकारसुद्धा नाराज झाले आहे. सनीने मात्र न डगमगता सर्व प्रश्नांची रोखठोक उत्तरे दिली.
अँकरने विचारलेले प्रश्न-सनीची उत्तरे
प्रश्नः पोर्न इमेजमुळे आमिर खानसारखे मोठे स्टार्स तुझ्यासोबत काम करु इच्छित नाहीत. तू या इमेजमुळे नाखुश आहेस का?
उत्तरः माझ्या भूतकाळामुळे कदाचित त्यांना माझ्यासोबत काम करायचे नसेल. मात्र या गोष्टीमुळे मी खचले नाही. मी आमिरची चाहती आहे, त्याचे सर्व सिनेमे बघते. मी रिअॅलिटीवर विश्वास ठेवते. होय, इंडस्ट्रीत आल्यानंतर नक्कीच माझी काही स्वप्नं आहेत. आज नाही तर उद्या नक्कीच मला इंडस्ट्रीतील मोठ्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळेल.
प्रश्नः भूतकाळात केलेल्या चुकीला पुसून टाकणार आहेस (पोर्न इमेजविषयी) का?
उत्तरः नाही, मी जे केले ते 100 टक्के केले. मला याविषयी मुळीच खंत नाहीये. मी आयुष्यात जे केले, त्यामुळेच आज या जागेवर बसली आहे.
प्रश्नः भारतीय गृहिणी तुझ्या पॉप्युलॅरिटीमुळे घाबरल्या आहेत. तुझ्याविषयी त्यांच्या मनात चुकीच्या धारणा आहेत?
उत्तरः भारतीय महिलांनी मला घाबरण्याची गरज नाही. मी त्यांच्या नव-यांना त्यांच्यापासून हिसकावून घेणार नाहीये. माझ्याजवळ माझा नवरा आहे. तो हॉट, सेक्सी आणि टॅलेंटेड आहे. संपूर्ण गृहिणींना सांगू इच्छिते, की मला त्यांच्या नव-यांमध्ये मुळीच रस नाहीये. (तिस-या व्हिडिओत पाहा सनीची संपूर्ण मुलाखत)
सोशल साइट्सवर उमटल्या तीव्र प्रतिक्रिया
जवळजवळ 20 मिनिटांच्या या मुलाखतीत सनी लिओनला तिच्या पोर्न इमेजमुळे तिचा पाणउतारा करण्याचा प्रयत्न केला गेला. ही मुलाखत प्रसारित झाल्यानंतर ऋषी कपूर, सुशांत सिंह राजपूतसह अनेक कलाकारांनी सनीला पाठिंबा देत अँकरला असभ्य ठरवले.
पुढे वाचा, सनीला पाठिंबा देणा-या कलाकारांच्या प्रतिक्रिया...