आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या पिढीच्या कलाकारांवर संतापले ऋषी कपूर, विनोद खन्नांच्या अंत्यसंस्काराला ए-स्टार्स गैरहजर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः अभिनेते विनोद खन्ना यांच्या पार्थिवावर गुरूवारी अंत्यसंस्कार झाल्यानंतर अभिनेता ऋषी कपूर यांनी बॉलिवूडच्या नव्या पिढीविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. विनोद खन्ना यांच्या पार्थिवावर वरळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले, त्यावेळी बॉलिवूडच्या नव्या पिढीतीली एकही कलाकार उपस्थित नव्हता. त्यांनी ट्विट करुन लिहिले, की नव्या पिढीचा एकही अभिनेता किंवा अभिनेत्री विनोद खन्नांच्या अंत्यसंस्कारावेळी नव्हता, हे लाजीरवाणं आहे.  

प्रियांका चोप्राच्या पार्टीत सहभागी झाले, पण येथे कुणी नाही आलं... 
- ऋषी कपूर यांनी आपला संताप ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केला. त्यांनी लिहिले, ''नव्या पिढीचा एकही अभिनेता वा अभिनेत्री विनोद खन्नांच्या अंत्यसंस्कारावेळी  नव्हता ... हे लाजिरवाणं आहे... काहींनी तर त्यांच्यासोबत कामही केलं आहे... दुसऱ्याचा आदर करायला शिकलं पाहिजे... असं का? 
- पुढे ते म्हणतात, ''माझ्यावेळेसही कुणी खांदा देण्यास येणार नाही अशी मी स्वतःच्या मनाची तयारी करायला हवी....''
- ''स्वतःला स्टार म्हणवून घेणा-यांचा आज खूप राग आला आहे... काल रात्री प्रियंका चोप्राच्या पार्टीमध्ये कितीतरी 'चमचा' लोकांना भेटलो... इथे मात्र त्यातले काहीच जणं होते...'', असे ऋषी कपूर म्हणाले.
- आणखी एका ट्विटमध्ये त्यांनी रणबीर कपूर देशाबाहेर असल्याने उपस्थित राहू शकला नसल्याचं स्पष्टीकरण दिलं.
 
 
अमिताभ, गुलजार यांच्यासह अनेक कलाकारांनी घेतले अंत्यदर्शन... 
- विनोद खन्ना यांच्या निधनाने बॉलीवूडवर शोककळा पसरली. महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या आगामी सिनेमाचे प्रमोशन गुंडाळून रुग्णालयाकडे धाव घेतली. 
- विनोद खन्ना यांच्या पार्थिवावर वरळीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगा साक्षी याने त्यांच्या पार्थिवाला अग्नि दिला.
- अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, गुलजार, कबीर बेदी, रंजित, सुभाष घई, ऋषी कपूर, रणधीर कपूर, दिया मिर्जा, रणदीप हुड्डा, चंकी पांडे, उदित नारायण, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
 
बुधवारी झाली होती प्रियांका चोप्राची पार्टी... 
- विनोद खन्नांच्या मृत्यूच्या एकदिवस आधी प्रियांका चोप्राच्या घरी एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं.
- या पार्टीत, कंगना रनोट, तमन्ना भाटिया, सोफी चौधरी, फरहा अली खान, सुष्मिता सेन, ईशा गुप्ता, कुणाल कोहली, अब्बास-मस्तान, ओमंग कुमार, ऋषी कपूर, अनिल कपूर, माधुरी दीक्षित आणि पती श्रीराम नेने, आशुतोष गोवारीकर, रमेश तौरानी, सुभाष घई आणि विधू विनोद चोप्रा हे कलाकारांनी उपस्थिती लावली होती.
 
अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये 48 वर्षांची मैत्री अग्नित भस्म होताना पाहिली, असे लिहिले. अमिताभ बच्चन यांनी लिहिलेला ब्लॉग जशाच्या तशा येथे देतोय.  
 
आदर और स्नेह॥
आज के दिन, जब 48 वष॔ के संबंध को अग्नि की ज्वाला में भस्म होते देखा है, तो आपकी रचना का एक एक शब्द मानव जीवन के सत्य का अदभुत दर्पण है। यदि आज्ञा हो तो इसे मैं अपने social media के मंच पर प्रदर्शित करना चाहूंगा।
अमिताभ बच्चन
 
या मेसेजसोबतच अमिताभ बच्चन यांनी प्रसून्न जोशी यांची एक कवितासुद्धा शेअर केली.

आश्वस्त हूं..
सर्प क्यों इतने चकित हो 
दंश का अभ्यस्त हूं
पी रहा हूँ विष युगों से 
सत्य हूँ आश्वस्त हूं
 
ये मेरी माटी लिए है 
गंध मेरे रक्त की 
जो कहानी कह रही है 
मौन की अभिव्यक्त की 
मैं अभय ले कर चलूंगा 
ना व्यथित ना त्रस्त हूं
 
वक्ष पर हर वार से 
अंकुर मेरे उगते रहे 
और थे वे मृत्यु भय से 
जो सदा झुकते रहे
भस्म की सन्तान हूं मैं
मैं कभी ना ध्वस्त हूं
 
है मेरा उद्गम कहां पर 
और कहां गंतव्य है 
दिख रहा है सत्य मुझको 
रूप जिसका भव्य है 
मैं स्वयम् की खोज में 
कितने युगों से व्यस्त हूं
 
है मुझे संज्ञान इसका
बुलबुला हूं सृष्टि में 
एक लघु सी बूंद हूं मैं 
एक शाश्वत वृष्टि में 
है नहीं सागर को पाना 
मैं नदी संन्यस्त हूं
 
हेही वाचा..
 
 
 
 
 
 
बातम्या आणखी आहेत...