आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'बाहुबली\' सेटवर \'कुणी घर देता का घर\', ऋषी कपूर यांनी व्यक्त केली इच्छा...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'बाहुबली 2' चित्रपटाने नुकताच 1000 कोटींचा टप्पा ओलांडून भारतीय चित्रपटांमध्ये इतिहास रचला आहे. हा केवळ चित्रपट नसून 'चक्रीवादळ' आहे असा उल्लेखही याबाबत होते आहे. केवळ 10 दिवसांत असा विक्रम करणाऱ्या या चित्रपटाच्या प्रेमात सर्वच जण आहेत. त्याला बॉलिवूड कलाकारही अपवाद नाहीत.
 
'बाहुबली 2' चित्रपट बघताना ऋषी कपूर यांनी या चित्रपटाच्या सेटवर घर मिळेल का? असा सवालही केला आहे. काही दिवसापूर्वी 'बाहुबली' सारखा चित्रपट बॉलिवूडमध्ये का बनू शकत नाही याची 5 कारणे समोर आली होती. 
 
ऋषी कपूर नेहमीच त्याचे मनमोकळे मत ट्विटरवर व्यक्त करत असतात. त्यांना 'बाहुबली 2' हा चित्रपट इतका आवडला की, त्यांनी ट्विटरवर कोणी 'बाहुबली' च्या सेटवर 2bhk घर देईल का? असेही विचारले. यासाठी कोणी एजंट आहे का असेही मिश्किलपणे त्यांनी मागणी केली. 
 
'बाहुबली' सारखा चित्रपट तयार होण्यासाठी अनेक चित्रपटांचा बळी द्यावा लागेल, असेही त्यांनी सांगितले. चित्रपटसृष्टीचा हिस्सा असल्याचा अभिमान वाटतो, असेही त्यांनी ट्विट केले आहे. 
बातम्या आणखी आहेत...