बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर पुन्हा एकदा
आपल्या ट्विटमुळे चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी एका नागा साधूला आपल्या निशाण्यावर घेतले आहे. लिंगम स्वामी नावाच्या या साधूचे वादग्रस्त छायाचित्र शेअर करुन त्यांनी वादग्रस्त माहिती शेअर केली आहे. या ट्विटमुळे वादाला तोंड फुटले आहे.
ऋषी कपूर यांनी या ट्विटमधून लोकांना जागरुक होण्यास सांगितले आहे. ते अनेकदा आपल्या ट्विटर अकाउंटच्या माध्यमातून फिल्म इंडस्ट्री आणि सामाजिक विषयांवर टीका करत असतात. आता त्यांनी देशातील आध्यात्मिक गुरु आणि बाबांना निशाण्यावर घेतले आहे.
ऋषी कपूर यांनी लिंगम स्वामी नावाच्या नागा साधूविषयी वादग्रस्त माहिती शेअर केली आहे. ऋषी यांनी सांगितले, की लिंगम स्वामी नावाचा हा साधू आपल्या लिंगाद्वारे लोकांना आशिर्वाद आणि वरदान देतो. ऋषी यांच्या मते, तो पुरुषांना आयुष्यभर वीर्यवान राहण्याचा आशीर्वाद देतो. यावर टीका करताना त्यांनी लिहिले, आपल्या देशातील लोक किती भोळे आहेत, जे अशा बाबांच्या खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवतात. हे लाजिरवाणे आहे.
आणखी एक ट्विट करुन त्यांनी लोकांना जागरुक होण्यास सांगितले आहे. सोबतच आपल्या देशात काय सुरु आहे? हा प्रश्नही उपस्थित केला. त्यांच्या मते, धर्माच्या नावावर लोकांना वेडे बनवले जात असून त्यांचा गैरफायदा घेतला जातोय. यापूर्वीही ऋषी कपूर आणि आध्यात्मिक गुरु आणि इतर विषयांवर वादग्रस्त ट्विट केले आहेत.
ऋषी कपूर यांनी यापूर्वी केलेले वेगवेगळ्या विषयांवर केलेले ट्विट्स बघा पुढील स्लाईड्समध्ये...