आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऋषी कपूर यांचा \'बाबा\' विरोध: राधे माँच्या पदराआडून उडवली बप्पी लहरींची खिल्ली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बॉलिवूड अभिनेता ऋषी कपूरने टि्वटरवर स्वयंघोषित राधे माँ आणि इतर कथित भोंदूबाबांच्या विरोधात मोर्चा काढला आहे. ऋषी कपूर यांनी अनेक टि्वट्स केले आहेत. राधे माँविषयी लिहिले, 'लिपस्टिक, आयशॅडो, ज्वेलरी आणि आणखी भरपूर काही... ही काहीप्रमाणात माझा मित्र बप्पी लहरीसारखीच दिसतेय.'
या टि्वटमध्ये त्यांनी राधे माँच्या निमित्ताने का होईना, पण बप्पी लहरी यांची खिल्ली उडवली आहे. शिवाय त्यांनी आसाराम, ओशो, सत्य साईबाबा आणि राधे माँचा एक फोटो शेअर करून देशाला जागृत होण्यास सांगितले आहे. त्यांनी लिहिले, 'जागो इंडिया जागो! अशा लोकांमुळे कमकुवत लोकांचा फायदा घेतला जात आहे. मीसुध्दा एक अभिनेता आहे, परंतु मी केवळ मनोरंजन करतो.'
ऋषी कपूर यांनी FTIIचे चेअरमन गजेंद्र चौहानसोबत राधे माँचा एक फोटो शेअर करू त्यांच्या निशाण साधला आहे. त्यांनी पोस्ट केले, 'एक एल्पायरिंग FTII विद्यार्थी दुस-या स्पिरिंग FTII प्रिन्सिपलला आशिर्वाद देत आहे. जय हो राधे राधे.' एवढेच नव्हे ऋषी कपूर यांनी स्वत:चा एक फोटो शेअर करून स्वत:ला बाबाच्या रुपात दाखवले आहे. विनोदी अंदाजात म्हटले, की आणखी एक बाबा तयार होत आहे, ऋषी मुनी ऋषी!
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा ऋषी कपूरचे टिवट्स...