मुंबईः उरी हल्ल्यानंतर देशातील वातावरण सध्या चांगलंच ढवळून निघालं आहे. जनमाणसात पाकिस्तानला धडा शिकवला जावा अशी एक तीर्व भावना निर्माण झाली आहे. मात्र, हे वाटतं तितकं सोपं नाहीये. या ढवळलेल्या वातावरण राजकीय पक्ष आपल्या पोळ्या भाजण्यासाठी पुन्हा एकदा तयार झाले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उरी हल्ल्यानंतर पुन्हा एकदा पाकिस्तानी कलाकारांना टार्गेट केले. पाकिस्तानी कलाकारांनी भारत सोडून जावे, अशी धमकी मनसेने दिली आहे. इतकेच नाहीतर करण जोहर यालाही धमक्यांचे फोन येत आहेत. कारण करण जोहरच्या आगामी ‘ऐ दिल है मुश्कील’ या सिनेमात ऐश्वर्या राय बच्चन, अनुष्का शर्मा आणि रणबीर कपूर यांच्यासोबत पाकिस्तानी अभिनेता फवाद खानची मुख्य भूमिका आहे.
पाकिस्तानी कलावंतानी 48 तासांच्या आत मायदेशी परत जावं अन्यथा जिथे काम करत असाल तिथे घुसून मारू अशी धमकी मनसेने दिली होती. आता हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, फवाद खानने गुपचुपरित्या भारतातून पळ काढला आहे. दिग्दर्शक करण जोहरचा प्रसिद्ध टॉक शो 'कॉफी विथ करण'चं पाचवं सत्र लवकरच सुरू होणार आहे. 'कॉफी विथ करण'च्या पहिल्या एपिसोडमध्ये फवाद खान गेस्ट म्हणून येणार होता. मात्र, मनसेच्या धमकीनंतर फवादच्या जागी शाहरूख खान आणि आलिया भट येणार आहेत. पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालून हा प्रश्न सुटणार आहे का? असा प्रश्न करण जोहर याने उपस्थित केला आहे.
पुढे वाचा, मनसेच्या या अल्टीमेटमनंतर काय म्हणाला रितेश देशमुख...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)