आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हा आहे मराठी बाणा, \'टोटल धमाल\'ला रितेश देशमुखने या अटींवर दिला होकार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रितेश देशमुखने टोटल धमालला होकार दिला आहे. - Divya Marathi
रितेश देशमुखने टोटल धमालला होकार दिला आहे.

मुंबई - मराठी माणूस मग तो सर्वसामान्य असेल किंवा सेलेब्स, जेव्हा विषय मुलांचा येतो तेव्हा कोणीही तडजोड करत नाही. याचाच प्रत्यय नुकताच रितेश देशमुखने दिला आहे. अशी माहिती आहे, की रितेश देशमुखने 'टोटल धमाल' चित्रपटामध्ये काम करण्यास होकार दिला आहे. मात्र त्यासोबतच त्याने डबल मीनिंग डायलॉगला स्पष्ट नकार दिला आहे. 

 

- 2007 मध्ये दिग्दर्शक इंद्र कुमार यांची कॉमेडी फिल्म 'धमाल' सर्वांच्या पसंतीस उतरली होती. 2011 मध्ये या फिल्मचा सिक्वल 'डबल धमाल' आला आणि आता इंद्र कुमार 'टोटल धमाल'ची तयारी करत आहे. 
- या सीरिजच्या थर्ड पार्टमध्ये संजय दत्त ऐवजी अजय देवगण दिसणार आहे. 
- काही दिवसांपूर्वी चर्चा होती की अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित देखील या फिल्मध्ये असणार आहेत. हे दोघे 17 वर्षानंतर एकत्र येत आहेत. 

 

डबल मीनिंगला दिला नकार 
- 'ग्रेट ग्रँड मस्ती' रिलीज झाल्यानंतर रितेशनचे म्हटले होते, की यापुढे डबल मीनिंग डायलॉग्स असणाऱ्या कॉमेडी फिल्म करणार नाही. 
- रितेश देशमुख आता दोन मुलांचा पिता आहे. त्याने म्हटल्यानुसार, मुले मोठी झाल्यानंतर त्यांना माझे चित्रपट पाहिल्यानंतर शरमेने मान खाली घालावी लागेल अशा कोणत्याही फिल्म यापुढे करणार नाही.
- 'टोटल धमाल' कॉमेडिने भरपूर असणार आहे. मात्र ही फिल्म नीट अँड क्लीन असणार आहे. यात डबल मीनिंग डायलॉग्ज असणार नाहीत. ही एक कम्पलिट फॅमिली फिल्म असेल. याची शाश्वती मिळाल्यानंतरच रितेशने या फिल्मला होकार दिला आहे. येत्या काही महिन्यात फिल्मचे शुटिंग सुरु होईल.

बातम्या आणखी आहेत...