आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rituparna Sengupta Shared Interesting Thing About Her Life

वादाशी आहे या अभिनेत्रीचे नाते, शेअर केल्या आयुष्याशी निगडीत गोष्टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बांग्ला आणि हिंदी सिनेमांची अभिनेत्री रितुपर्णा सेनगुप्ता - Divya Marathi
बांग्ला आणि हिंदी सिनेमांची अभिनेत्री रितुपर्णा सेनगुप्ता
चंडीगढ: बांग्ला आणि हिंदी सिनेमांत काम करणारी अभिनेत्री रितुपर्णा सेनगुप्ता सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. रितुपर्णा सेनगुप्ता बोल्ड आणि वादग्रस्त सिनेमांसाठी ओळखली जाते. अलीकडेच एका इव्हेंटमध्ये चंदीगढला आलेली रितुपर्णाने मीडियासोबत संवाद साधला, त्यावेळी तिने आयुष्याशी निगडीत अनेक गोष्टी शेअर केल्या.
आयटम डान्ससाठी तयार आहे रितुपर्णा...
- रितुपर्णाने सांगितले, की हिंदी भाषिक अभिनेत्री आयटम डान्स करून लोकप्रिय होतात.
- मला आयटम डान्स करण्यात काहीच गैर वाटत नाही. कारण, त्याचा उद्देश प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचाच आहे.
- भविष्यात जर एखादी संधी मिळाली तर आयटम डान्ससुध्दा करेल.
महेश भट यांच्या सिनेमांत झळकणार...
- रितुपर्णाने सांगितले, की महेश भट एक बांग्ला सिनेमा हिंदीत रिमेक करत आहेत.
- आजच्या हिंदी सिनेमांवर रितुपर्णा सांगते, की हिंदी सिनेमांना सध्याचा चांगला काळ म्हटले जाते. आजकाल विविध कहाण्यांवर सिनेमे बनत आहेत.
रितुपर्णाच्या सांगण्यानुसार, सध्याचा एक चांगली गोष्ट अशी आहे, की कलाकार त्यांच्या इमेजमुळे नाही तर त्यांच्या भूमिकेमुळे ओळखले जातात.
- त्यामुळे कलाकार आपल्या रेंजनुसार, विविध सिनेमे निवडू शकतात.
- शिवाय रेवती, तेजस्विनी कोल्हापूरे, पूरब कोहली, हितेन तेजवानी, विनय पाठक आणि जिमी शेरगिलसारखे कलाकारांसोबत रितुपर्णाने अनेक सिनेमांत काम केले आहे.
काजोल आणि विद्या बालनसारखे सिनेमे करण्याची ईच्छा...
- रितुपर्णाने सांगितले, 'गेल्या काही वर्षांपासून माझ्या जीवनात आणि विचारात खूप बदल झाला आहे.'
- चांगल्या भूमिका आणि सिनेमे निवडणे आपली जबाबदारी असते, कारण प्रेक्षकांना आपल्याकडून खूप अपेक्षा असतात.
- बॉलिवूडमध्ये असे सिनेमे करायचे आहेत, ज्यात संभावना आहेत. केवळ आकडे वाढवण्यासाठी कोणताही सिनेमे करेल असे कधीच होणार नाही.
- भूमिका अशी हवी, ज्यामुळे कहाणीवर फरक पडेल. काजोल आणि विद्या बालन असेच सिनेमे करत आहेत. मला त्याच परंपरेचा एक भाग व्हायचे आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा रितुपर्णा सेनगुप्ताचे ग्लॅमरस PHOTOS..