आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिया सेन बॉयफ्रेंडसोबत अडकली विवाहबंधनात, व्यवसायाने फोटोग्राफर आहे पती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई -  बॉलिवूड अभिनेत्री मुनमुन सेन यांची मुलगी रियाने बॉयफ्रेंड शिवम तिवारीसोबत लग्न केले आहे. रियाच्या एका क्लोज सोर्सने सांगितलेल्या माहितीनुसार, लग्नाच्या सर्व विधी बुधवार, 16 ऑगस्ट रोजी पुणे येथे पार पडल्या. या खासगी समारंभात कुटुंबीय आणि मोजके मित्रमैत्रीणी सहभागी झाले होते. रिया नेहमीच शिवमसोबत तिचे फोटो इन्सटाग्रामवर शेअर करत असते. पण लग्नाचा अजून कोणताच फोटो शेअर केलेला नाही. रियाचा 2005 साली एक एमएमएस समोर आला होता ज्यात ती अश्मित पटेलसोबत दिसली होती. या चित्रपटाने केला होता डेब्यू..
 
- रियाने 'स्टाइल'(2001) चित्रपटातून डेब्यू केला होता. यात तिच्यासोबत शर्मन जोशी आणि साहिल खान मुख्य भूमिकेत होते. 
- रियाने 'दिल विल प्यार व्यार'(2002), 'झनकार बीट्स'(2003), 'कयामत'(2003), 'शादी नंबर-1'(2005) या चित्रपटांत काम केले आहे.
- रिया फाल्गुनी पाठकच्या अल्बममधून प्रसिद्ध झाली होती.
- रिया सेन सर्वात शेवटी अग्निदेव चॅटर्जी यांच्या 'डार्क चॉकलेट' चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट शीना बोरा मर्डर केसवर आधारीत होता. रियाने अनेक तामिळ आणि बंगाली चित्रपटात काम केले आहे. 
 
कोण आहे शिवम तिवारी..
- शिवम तिवारी फोटोग्राफर आहे. तो नेहमीच ट्रॅव्हल टीप आणि डेस्टीनेशंस फोटोज सोशल मीडियावर शेअर केला आहे. रिया सेन काही वर्षांपासून शिवमला डेट केले आहे. 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, रिया आणि शिवमचे काही खास PHOTOS..
बातम्या आणखी आहेत...