आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

KRK ने आमिर खानबदद्ल केले इतके अश्लील वक्तव्य, ट्वीटरने ब्लॉक केले अकाउंट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आमिर खानबद्दल अश्लील वक्तव्य करणे कमाल राशिद उर्फ केआरकेला चांगलेच महागात पडले आहे. यामुळे ट्वीटरने त्याचे अकाउंट ब्लॉक केले आहे. केआरकेने गुरुवारी रिलीज झालेल्या आमिर खानच्या सिक्रेट सुपरस्टारबद्दल तीन ट्वीट केले ज्यात त्याने लिहीले की आमिरने कशाप्रकारे वडिलांना चुकीच्या प्रकारे दाखविले आहे.  ट्वीट्सचे अनुवाद पुढीलप्रमाणे..
 
- 'सीक्रेट सुपरस्टार'च्या क्यायमॅक्समध्ये असे दाखवण्यात आले आहे की वडील एकटा दुबईला निघून जातो आणि आई-मुलगी भारतात राहतात." 
- "आमिर खान जर तु असे दाखवु इच्छित आहे की, मी आणि माझ्याप्रमाणे इतर अनेक वडील त्यांच्या मुलांवर प्रेम करत नाहीत तर तुझ्या चित्रपटाला तुझ्या पि#@$ मध्ये एन्जॉय कर.ठ
- "मिस्टर आमिर खान जर तु एक चांगला वडील नाहीस किंवा तुझे वडील चांगले पिता नव्हते ज्यांचा तु सन्मान करत नाहीस तर असे म्हणू नकोस की आम्हीही आमच्या मुलांवर प्रेम करत नाहीत." 
 
ट्वीटरविरुद्ध कोर्टात जाणार केआरके...
 
- केआरकेने सांगितले की तो ट्वीटरच्या या अॅक्शनविरुद्ध कोर्टात जाणार आहे 
- त्याचे म्हणणे आहे की मागील चार वर्षात त्याने जितके फॉलोअर्स बनवले आणि त्यासाठी जितका वेळ आणि पैसे खर्च केले तो वेळ त्यांना वापस हवा आहे.
- केआरकेने सांगितले की त्याचे ट्वीटर हँडल यासाठी सस्पेंड करण्यात आले आहे की त्याने सिक्रेट सुपरस्टारच्या त्रुटी सांगितल्या आहेत. 
- मीडियाशी बोलताना केआरके म्हणाला की, "मी ट्वीटरवर कोणतेही नवीन अकाउंट ओपन करणार नाही. आमिर खानला मी ट्वीटरवर नकोय म्हणून त्याच्या म्हणण्यानुसार हे सर्व झाले आहे. आमिर खानच ट्वीटरचा मालक आहे असे वाटते."
- केआरकेने ट्वीटसवर सफाई देताना सांगितले की, त्याने कोणालाही धमकी दिली नाही अथवा शिवी दिली नाही. यामुळे ट्वीटरकडे त्याचा अकाउंट डिलीट करण्याचे काही कारण नाही. 
 
दुबईमध्ये राहतात केआरके यांची मुले...
- 42 वर्षीय कमाल रशिद खान विवाहीत आहे आणि त्याला दोन मुले आहेत.
- कमालची पत्नी आयशा, मुलगा फैजल आणि मुलगी फराह दुबईत राहते. केआरके मुंबईत एकटा राहतो. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, केआरकेने केलेले ट्वीट्स आणि त्याच्या कुटुंबाचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...