आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कष्ट काय असतात, हे ओम पुरींकडूनच शिकायला हवे : रोहिणी हत्तंगडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेते ओम पुरी यांच्यासोबत पुकार, घातक, रात, आघात, पार्टी, अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है  यांसारख्या अविस्मरणीय सिनेमांमध्ये काम करणा-या अभिनेत्री रोहिणी हत्तंगडी यांनी ओम पुरींसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. बॉलिवूड भास्करसोबत केलेल्या खास बातचीतमध्ये रोहिणी यांनी अनेक गोष्टी सांगितल्या.  

त्या म्हणाल्या, 'ओम पुरींच्या निधनाच्या बातमीने मी अतिशय दुःखी झाली आहे. आम्ही दोघे नॅशनल स्कूल ऑफ ड्रामापासून सोबत होतो. ते माझ्यापेक्षा एक वर्षांनी सीनिअर होते. मी फस्ट  ईयरमध्ये तर ते सेकंड ईयरमध्ये होते. नॅशनल स्कूलमध्ये माझी पहिली भूमिका त्यांच्यासोबत होती. एकेदिवशी मला अचानक सांगण्यात आले होते, की एका नाटकात काम करायचे आहे आणि तेसुद्धा ओम पुरींसोबत. त्याकाळात डबल कास्टिंग व्हायची. मला अभिनयाविषयी काहीच ठाऊक नव्हते. मात्र त्यांनी मला त्याकाळात खूप मदत केली होती. मला त्यावेळी अॅक्टिंगसाठीचे ब्लॉकिंग मुव्स माहित नव्हते. त्यामुळे त्यांना याविषयी विचारले, तर ते म्हणाले, 'मुली, तू उद्या सकाळी 6 :30 वाजता ओपन हॉलमध्ये पोहोच.' आम्ही सकाळी पाठांतर करायचो आणि सकाळी नऊ वाजता क्लासमध्ये जायचो. मी ज्युनिअर होती आणि त्यावेळी मला सर्वकाही शिकायचे होते. ओमजींनी मला बरेच काही शिकवले. ते अतिशय कष्टाळू होते."
 
पुढे वाचा, ओम पुरींचा सेन्स ऑफ ह्युमर होता जबरदस्त...
बातम्या आणखी आहेत...