आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rohit Shetty Under CBI Scanner For Bribing Ex Censor Chief

रोहित शेट्टी CBI च्या कचाट्यात, Singham Returns साठी लाच दिल्याचा आरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'सिंघम रिटर्न्स'मध्ये अजय देवगण आणि करीना मेन लीडमध्ये आहेत. तर रोहित शेट्टी या सिनेमाचा दिग्दर्शक आणि निर्माता आहे. - Divya Marathi
'सिंघम रिटर्न्स'मध्ये अजय देवगण आणि करीना मेन लीडमध्ये आहेत. तर रोहित शेट्टी या सिनेमाचा दिग्दर्शक आणि निर्माता आहे.
('सिंघम रिटर्न्स'मध्ये अजय देवगण आणि करीना मेन लीडमध्ये आहेत. तर रोहित शेट्टी या सिनेमाचा दिग्दर्शक आणि निर्माता आहे.)
मुंबई : सीबीआयच्या मुंबई शाखेने रोहित शेट्टीवर खटला दाखल करण्याची परवानगी मागितली आहे. त्यामुळे आता गोलमाल, सिंघम, चेन्नई एक्स्प्रेस यांसारख्या हिट सिनेमांचा हा प्रसिद्ध दिग्दर्शक अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. 'सिंघम रिटर्न्स' या सिनेमासाठी सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्याला दोन लाखांची लाच दिल्याच्या आरोप त्याच्यावर लावण्यात आला आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 'सिंघम रिटर्न्स' सिनेमाला सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी रोहित शेट्टीने त्याच्या प्रॉडक्शन हाऊसच्या माध्यमातून सेन्सॉर अधिकाऱ्यांना दोन लाख रुपयांची लाच दिल्याचा आरोप आहे. 'सिंघम रिटर्न्स' या सिनेमाचा प्रीमियर 14 ऑगस्ट 2014 रोजी दुबईमध्ये पार पडणार होता. त्याआधीच सिनेमाला सेन्सॉर बोर्डाचे सर्टिफिकेट मिळावे यासाठी रोहित शेट्टी आणि पल्ली नामक व्यक्तीने राकेश कुमार या अधिकाऱ्याला दोन लाखांची लाच दिल्याचे कळते.
'सिंघम रिटर्न्स'ला 8 ऑगस्ट 2014 रोजी सेन्सॉर बोर्डाचे सर्टिफिकेट मिळाले होते. मुंबई शाखेने यावर्षी जानेवारी महिन्यात याबाबतची शिफारस सीबीआयच्या दिल्लीतील मुख्यालयाला केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरु असल्याचं सीबीआयच्या प्रवक्त्यांनी सांगितलं.
काय आहे प्रकरण?
सुत्रांच्या माहितीनुसार, सेन्सॉर बोर्डासाठी 'सिंघम रिटर्न्स'चे स्क्रिनिंग 7 ऑगस्ट रोजी ठेवण्यात आले होते. या स्क्रिनिंगसाठी रोहित शेट्टी आणि त्याच्या प्रॉडक्शन हाऊसचे किशन पल्ली उपस्थित होते. 'सिंघम रिटर्न्स'ला सर्टिफिकेट देण्यासाठी राकेश कुमारने दोन सदस्यांना कोऱ्या फॉर्मवर स्वाक्षरी करण्यास दबाव आणला. कमिटीने हे तिघे जण सिनेमांना सेन्सॉर सर्टिफिकेट देणाऱ्या स्क्रीनिंग कमिटीचे सदस्य आहे. रोहित शेट्टी आणि त्याच्या प्रॉडक्शन हाऊसचे किशन पल्ली यांनी त्यांना लाच दिली होती, असे सुत्रांचे म्हणणं आहे. या सेन्सॉर अधिकाऱ्यांनी नियम डावलून रोहित शेट्टीच्या 'सिंघम रिटर्न्स'साठी प्रमाणपत्र दिल्याचा आरोप आहे. सीबीआय सध्या प्रकरणाचा तपास करत असून रोहित शेट्टीनेही या प्रकरणावर बोलण्यास नकार दिला आहे.