आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आमिरच्या घरी चोरट्यांच्या डल्ला, पत्नी किरणचे 53 लाख रुपयांचे दागिने चोरीला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः आमिर खानच्या खारस्थित अपार्टमेंटमध्ये चोरीची घटना घडली आहे. रिपोर्ट्सनुसार, चोरट्यांनी आमिरची पत्नी किरण रावच्या किंमती दागिन्यांवर हात साफ केला आहे. चोरट्यांनी किरणच्या महागड्या डायमंड नेकलेससह 53 लाख रुपये किंमतीचे दागिने चोरी केले आहेत. किरणच्या वडिलांनी 24 नोव्हेंबर रोजी खार पोलिस स्टेशनमध्ये या चोरीची तक्रार नोंदवली आहे. गेल्या आठवड्यात किरणची हि-याची अंगठी आणि नेकलेस गायब झाले होते. पोलिसांनी भांदवी कलम 453 अंतर्गत तक्रार दाखल करुन चौकशी सुरु केली आहे. घरी काम करणाऱ्या नोकरांची चौकशी करत आहेत पोलिस...

पोलिस गेल्या पाच दिवसांपासून आमिरच्या घरीचा कुक फरजाना, किरणची असिस्टंट सुजाना आणि एका अन्य मोलकरणीची चौकशी करत आहे. या तिघांची दिवसभर विचारपुस करुन त्यांना सोडून देण्यात येतंय. पोलिसांना अद्याप चोरी गेलेल्या वस्तू सापडल्या नाहीयेत. आमिर खान याकाळात त्याचा आगामी सिनेमा 'दंगल'च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, आमिर आणि त्याची पत्नी किरण रावचे निवडक फोटोज...
बातम्या आणखी आहेत...