आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Box Office : 'सचिन : अ बिलियन ड्रीम्स'ने पहिल्याच दिवशी जमवला 8.40 कोटींचा गल्ला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा बायोपिक ‘सचिन अ बिलियन ड्रीम्स’ या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी चांगली कमाई केली आहे.  या सिनेमाने भारतात सर्व भाषांमध्ये मिळून 8.40 कोटींची कमाई केली आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ट्विट करुन या ही माहिती दिली. त्यांनी ट्विट केले, Considering it's a docu-drama, #SachinABillionDreams opens IMPRESSIVELY... Fri ₹ 8.40 cr. India biz [Hindi, Marathi, Tamil, Telugu, English]
 
पाच भाषांमध्ये रिलीज झाला सिनेमा... 
हा सिनेमा भारतात 2400 आणि परदेशात 400 स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे. या विकेंडलाही सिनेमा चांगला गल्ला जमवण्याची शक्यता आहे. 26 मे रोजी म्हणजे शुक्रवारी हिंदी, मराठी, इंग्रजी, तमिळ आणि तेलुगू या भाषांमध्ये हा सिनेमा रिलीज झाला आहे.
 
पुढे वाचा, मोडू शकला नाही 'धोनी द अनटोल्ड स्टोरी' या सिनेमाचा विक्रम... 
बातम्या आणखी आहेत...