आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सचिन...' ने केली 'सरकार 3' पेक्षा 4 पट अधिक कमाई, या 21 चित्रपटांनाही पछाडले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शुक्रवारी रिलीज झालेला बायोग्राफिकल चित्रपट 'सचिन अ बिलियन ड्रीम्स' चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांच्या मते या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी 8.4 कोटींचे कलेक्शन केले आहे. जेम्स एर्सकाइन यांच्या दिग्दर्शनात तयार झालेला हा चित्रपट हिंदीशिवाय मराठी, तमिल, तेलुगू आणि इंग्रजीत रिलीज झाला आहे. सर्व व्हर्जनचे हे कलेक्शन आहे. 
 
अमिताभच्या चित्रपटापेक्षा चारपट ओपनिंग 
याच महिन्यात 12 तारखेला राम गोपाल वर्मा यांच्या दिग्दर्शनात तयार झालेला अमिताभचा 'सरकार 3' चित्रपट रिलीज झाला होता. त्या चित्रपटाने पहिल्या दिवशी 2.1 कोटींची कमाई केली होती. म्हणजे पहिल्या दिवशी सचिनच्या चित्रपटाने या चित्रपटापेक्षा चारपट अधिक कमाई केली आहे. 

पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, यंदा आणखी कोणते चित्रपट राहिले सचिनच्या चित्रपटाच्या मागे...
बातम्या आणखी आहेत...