आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'तेरी औकात क्या है..' सचिनच्या चित्रपटावरील कमेंटनंतर नेटिझन्सनी KRK ला असे झोडपले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सचिनच्या चित्रपटाबाबत KRK ने केले कमेंट, ट्विटरवर नेटिझन्सनी चांगलेच झोडपले 
सचिनबाबत KRK चे ट्वीट वाचल्यानंतर एका फॅनने रिप्लाय करत लिहिले, 'तेरी औकात क्या है, जो मेरे भगवान को झेलना बोलता है, तुझे दुनिया की सारी गालियां दो वो भी कम है'

एंटरटेनमेंट डेस्क - सचिन तेंडुलकरचा बायोपिक 'सचिनः अ बिलियन ड्रीम्स' रिलीज झाला आहे. या चित्रपटाबाबत स्वतःला क्रिटिक म्हणणारा KRK (कमाल आर. खान) ने नुकतेच ट्विटरवर असे काही पोस्ट केले, ज्यामुळे सचिनचे फॅन्स त्याच्यावर भडकले. KRK ने कमेंट करताना लिहिले, तर हा चित्रपट सचिनच्या सर्व जुन्या व्हिडीओवरून तयार करण्यात आला आहे. म्हणजे ही त्याच्याबाबतची डॉक्युमेंटरी फिल्म आहे. सॉरी मी हे सहन करू शकत नाही (मैं इसे नहीं झेल सकता). कमालच्या या ट्वीटनंतर सोशल मीडियावर सचिनच्या फॅन्सचा राग पाहायला मिळाला. अनेक ट्विट्स करत केआरकेला काहीही न बोलण्याचा सल्ला नेटिझन्सने दिला. काहींनी तर मारण्याची धमकीही दिली. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, KRK च्या कमेंटनंतर नेटिझन्सनी कसा व्यक्त केला राग... 
बातम्या आणखी आहेत...