आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sachin Tendulkar's Biopic Will Be Released In Next Year

यावर्षाच्या अखेरीस रिलीज होणार सचिनची Biopic, वाढदिवशी येणार Trailer

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सचिन तेंडुलकरच्या आयुष्यावर बनणा-या 'Sachin A Billion Dreams’ या सिनेमाचे पोस्टर सोमवार समोर आले. या सिनेमाचा टीजर त्याच्या वाढदिवशी म्हणजे २४ एप्रिल रोजी रिलीज करण्यात येणार आहे. हा सिनेमा यावर्षाच्या अखेरीस रिलीज होणार असल्याचे समजते. ही एक फिचर फिल्म असेल जिला डॉक्युमेंट्री स्टाइलमध्ये सादर करण्यात येणार आहे. सचिन स्वतः सिनेमात मुख्य भूमिका साकारतोय.

कोण आहे फिल्म डायरेक्टर...
- या सिनेमाचे डायरेक्टर जेम्स एर्स्किन आहेत. रवी भागचंडका आणि कार्निवाल मोशन पिक्चर्स या सिनेमाची निर्मिती करणार आहे.
- ए.आर. रेहमान या फिल्मचा संगीत दिग्दर्शक आहे.
- जेम्सने 'वन नाइट इन ट्यूरिन' आणि 'बॅटल ऑफ द सेक्सेज' यासारखी अनेक चर्चित फिल्म बनवल्या आहेत.
- गेल्या वर्षी सायकलिस्ट मार्को पैंटेनी याच्यावर बनविलेल्या सिनेमाला खूप नावाजले होते.
पोस्ट प्रॉडक्शन सुरु
सिनेमाचे एडिटिंग आणि पोस्ट प्रॉडक्शन सुरु झाले आहे. ते काम पूर्ण झाल्यानंतर सचिन सिनेमा बघणारेय. सूत्राच्या माहितीनुसार, "यावर्षी नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये सिनेमा रिलीजचे प्लानिंग सुरु आहे. सचिन एकदा फायनल प्रिंट बघून ते निश्चित करणार आहे."
पुढे वाचा, धोनीच्या चित्रपटाला टक्कर...