लखनऊ- उत्तर प्रदेशच्या सैफई महोत्सवात सोमवारी (11 जानेवारी) रात्री बॉलिवूड कलाकारांनी धूम केली. यावेळी अनेक बॉलिवूड कलाकारांनी परफॉर्मन्स दिला. तसेच दरम्यान रणवीर सिंह मुलायम सिंह यांच्या पायाजवळ बसला होता. कलाकारांनी या उत्सवात मुख्यमंत्री अखिलेश सिंह यादव यांची पत्नी डिंपल यादव यांनादेखील नाचवले. सपा चीफच्या गावात दरवर्षीप्रमाणेच यावर्षीसुध्दा हा महोत्सव डिसेंबरमध्ये सुरु झाला होता.
यावर्षी का चर्चेत राहिले सैफई महोत्सव...
- यावर्षी सैफई महोत्सव 26 डिसेंबरला सुरु झाले होते.
- पक्षातून दोन जवळच्या व्यक्तींना काढून टाकल्याने उद्धानावेळी अखिलेश यादव गेले नव्हते.
- अखिलेश यांच्या नाराजीनंतर मुलायम यांनी दोन्ही नेत्यांना पुन्ही पक्षात सामील केले.
- 2014मध्ये सैफई महोत्सवर बरेच चर्चेत आले होते. कारण मुजफ्फनगरमध्ये झालेल्या दंगलीनंतरसुध्दा सलमान खान, आलिया भटसारखे कलाकार डान्स करण्यासाठी महोत्सवात पोहोचले होते.
बॉलिवूड नाइट्समध्ये कोण-कोण पोहोचले...
- सैफ अली खान, करीना, रणवीर सिंह, सोनाक्षी सिन्हा, शमिता शेट्टी, अर्जुन कपूर, आयुष्मान खुराणा पोहोचले होते.
- कलाकारांसाठी इटावामध्ये दुपारच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.
- सैफई महोत्सवात राहत अली, सपना मुखर्जी, मीका सिंह, जावेद अली, अंकित तिवारी यांनी गाणे सादर केले.
- 9 जानेवारीला यूएसहून आली सुफी गायिका इत्तिदाने परफॉर्मन्स दिला होता.
- त्याचदिवशी अखिलेश यादव यांच्या मुलानेसुध्दा स्टेजवर गाणे गायले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सैफई महोत्सवातील कलाकारांच्या परफॉर्मन्सचे खास PHOTOS...