Home »News» Saif Ali Khan New Film Kaalakaandi Official Trailer Release

कॅन्सर असल्याचे कळताच सरकली सैफच्या पायाखालची जमीन, जीवन जगण्याची पद्धतच बदलली

दिव्य मराठी वेब टीम | Dec 07, 2017, 14:07 PM IST

सैफ अली खान स्टारर 'कालाकांडी' या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलरच्या सुरुवातीला सैफ अली खान एका डॉक्टरच्या केबीनमध्ये बसला असतो. डॉक्टर सैफला सांगतो, की त्याला पोटाचा कॅन्सर झाला आहे. हे ऐकून सैफ अली खान स्तब्ध होतो आणि त्यानंतर तो त्याची जीवन जगण्याची पद्धतच बदलून टाकतो. ट्रेलर बघता सैफचा हा चित्रपट एक डार्क कॉमेडी असल्याचे लक्षात येते. चित्रपटात सैफचा हटके लूक बघायला मिळतोय. विशेष म्हणजे या चित्रपटात बोल्डनेसचा तडकासुद्धा आहे. यातील डायलॉगदेखील बोल्ड आहेत. "भाड में गई पीचएडी, भाड में गई स्कॉलरशिप, पूरे देश को कामसूत्र सिखा दूंगी", असे बोल्ड संवाद चित्रपटात आहेत.


अक्षत वर्मा दिग्दर्शित हा चित्रपट पुढच्या वर्षी 12 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी अक्षत वर्माने 'देल्ही बेली' या चित्रपटाची पटकथा लिहिली होती. सैफ अली खानसोबत या चित्रपटात दीपक डोबरियाल, विजय राज, कुणाल रॉय कपूर, शोभिता धूलिपाला, अक्षय ओबेरॉय, ईशा तलवार, शिवम पाटिल, अमायरा दस्तूर, नारी सिंह आणि नील भूपलम या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आबेत.


काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला होता. या लूकमध्ये सैफने केसांना अनेक रबर बँड लावलेले दिसत होते. पुढील वर्षी ‘कालाकांडी’शिवाय सैफचा ‘बाजार’ हा आणखी एक चित्रपट प्रदर्शित होणार आहे.


पुढच्या स्लाईडवर बघा, 'कालाकांडी' या चित्रपटाचा ट्रेलर आणि फोटोज...

Next Article

Recommended