मुंबई- तीन वर्षांपूर्वी निर्माता सुनील खेत्रपालने एका सिनेमासाठी सैफ अली खानला 18 कोटींमध्ये साइन केले होते. एकापाठोपाठ 5 फ्लॉप सिनेमे दिल्यानंतर सैफ आता त्याच्यासोबत 6 कोटींत सिनेमा करण्यासाठी तयार झाला आहे. सिनेमाला नफा मिळाला तर सैफला नफ्यात 35 टक्के भागीदारी मिळणार आहे.
2013मध्ये आला होता सैफचा शेवटचा हिट सिनेमा...
अब्बास मस्तानीच्या दिग्दर्शनात आधी रेस फेंचाइजीचा तिसरा सिनेमा बनण्याची प्लानिंग केली होती. परंतु काही वादविवाद झाले. नंतर 'बाजीगर'चा सीक्वेल आणि इतर स्क्रिप्टवर काम सुरु झाले. परंतु कोणताच सिनेमा ठरला नाही. यादरम्यान सैफच्या करिअरचा आलेख खाली उतरत गेला. त्याचा शेवटचा हिट 2013मध्ये आलेला 'रेस' होता.
2014मध्ये दोन तर 2015मध्ये एक सिनेमा, तीन्ही फ्लॉप...
2013मध्ये 'गो गोवा गॉन' आणि 'बुलेट राजा', 2014मध्ये 'हमशकल्स' आणि 'हॅपी एंडिंग' आणि 2015मध्ये 'फँटम' अपयशी ठरले. इतकेच नव्हे करीनाच्या आत्याचा मुलगा अरमान जैनला लाँच करण्यासाठी सैफने आपल्या बॅनरखाली 'लेकर हम दीवाना दिल' सिनेमा निर्मित केला. बिझनेसमध्ये नुकसान आणि सोबतच सिनेमाने या कलाकारांची प्रतिमासुध्दा बिघडवली. छोट्या बॅनर्सचे सिनेमेदेखील त्याला कमी मानधनात ऑफर व्हायला लागले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, सैफच्या हातात अद्याप केवळ एक सिनेमा आणि मानधन घटवले. परंतु अटीसोबत...