आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या आलिशान महालात गेले बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानचे बालपण, पाहा PIX

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळः बॉलिवूडचा नवाब अर्थातच सैफ अली खानने नुकतीच वयाची 45 वर्षे पूर्ण केली आहेत. पतौडीचे नवाब मन्सूर अली खान पतौडी यांचा मुलगा असलेल्या सैफचे बालपण भोपाळ नवाबांच्या अहमदाबाद पॅलेस या आलिशान महालात गेले आहे. सैफची आजी साजिदा सुल्तान यांनी भोपाळ नवाबांचा वारसा पुढे नेला. त्यामुळे मन्सूर अली खान पतौडी येथेच वास्तव्याला होता. काही वर्षे भोपाळमध्ये राहिल्यानंतर सैफ अली खान शिक्षणासाठी पहिले दिल्लीत आणि नंतर मुंबई आला.
सैफ अली खानचे सुरुवातीचे शिक्षण भोपाळमध्ये झाले. सैफची आजी साजिदा सुल्तान भोपाळ नवाबांची दुसरी मुलगी होती. ज्या आलिशान महालात सैफचे बालपण गेले, तेथे आता कॉलेज उभे राहिले आहे. भोपाळ नवाबांच्या एक हजार कोटींच्या संपत्तीचा वाद कोर्टात सुरु आहे.
जाणून घेऊयात, सैफच्या पुर्वजांच्या साम्राज्याविषयी..
भोपाळचे शेवटचे नवाब हमीदुल्ला खान यांनी आपली संपत्ती भारत सरकारकडे सुपूर्त केली होती. त्याकाळी सरकारसोबत झालेल्या करारानुसार सरकारनेही नवाब घराण्याला काही संपत्ती दिली होती. त्या कराराला मर्जर अॅग्रीमेंट असे म्हटले गेले. याच संपत्तीवर आज नवाब मन्सूर अली खान पतौडींच्या पत्नी शर्मिला टागोर आणि मुलगा सैफ अली खानचा हक्क आहे. या संपत्तीवरुन वादही निर्माण झाले आहेत. शर्मिला टागोर जेव्हाही भोपाळमध्ये येतात, तेव्हा त्या संपत्तीची विक्री करायला आल्याच्या बातम्या चर्चेत येतात. अनेकदा या शाही कुटुंबाच्या संपत्तीच्या वाटणीवरुन बैठकासुद्धा झाल्या आहेत. मात्र त्यावर तोडगा निघाला नाही. करीना सैफसोबत विवाहबद्ध होण्यापू्र्वी येथे येऊन कोठी बघून गेली होती. सैफच्या कुटुंबीयांच्या मते, करीनाला ही कोठी अतिशय पसंत असून त्याची विक्री होऊ नये, अशी तिची इच्छा आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, या ऐतिहासिक महालाची दुर्मिळ छायाचित्रे...