आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actor Saif Alia Khan Reaction On Hafiz Shahid Complain

पाकमध्ये ‘फँटम’च्या बॅनवर बोलला सैफ, \'सर्वांना माहितीये 26/11चा मास्टरमाइंड कोण आहे\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- 'फँटम' या आगामी सिनेमावरून होणा-या वादामुळे अभिनेता सैफ अली खानने मीडियाकडे मनमोकळ्या गप्पा मारल्या. या पत्रकार परिषदेत सैफसोबत निर्माता साजिद नाडियाडवाला, दिग्दर्शक कबीर खान आणि लेखक हुसैन जैदीसुध्दा उपस्थित होते. मागील दिवसांत जमात-उद-दावाचे चीफ आणि 26/11च्या मुंबई हल्ल्याचा मास्टार माइंड हाफिज सईदने 'फँटम'वर पाकिस्तानात बॅन करण्याची मागणी केली आहे. यावर अभिनेता सैफ अली खानने सांगितले, की हा सिनेमा सत्यता दर्शवणारा आहे. सर्वांना माहित आहे, की 26/11साठी कोण जबाबदार होते.
सैफ म्हणाला, जर एक दहशतवादी एखाद्या देशाच्या कायदेशीर न्यायालयात जाऊ शकतो, तर माझ्या मते ही एक लाजीरवाणी बाब आहे. खरंच ही एका 'महान' देशाची निशाणी आहे, की ते एका दहशतवाद्याच्या याचिकेवर विचार करतात.
'फँटम' सिनेमाला पाकिस्तानच्या विरोधात प्रचार सांगून हाफिज सईदने लाहोर कोर्टात तक्रार दाखल केली आहे. हा सिनेमा मुंबईच्या 26/11 हल्ल्यावर आधारित असून यात हाफिज सईदचादेखील उल्लेख करण्यात आला आहे.
सईदने तक्रारीत काय म्हटले?
हफीज याने म्‍हटले, ''फँटममध्‍ये पाकिस्तानी विरोधी कंटेंट आहे. 28 ऑगस्ट रिलीज होणा-या या सिनेमात आपला देश आणि जमात-उद-दावाच्या विरोधात भडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्‍यामुळे त्‍यावर बॅन आणावा,'' अशी मागणी त्‍याने केली आहे. तसेच आपल्‍या पिटीशनमध्‍ये हाफिज याने या चित्रपटाला पाकिस्तानच्‍या विरुद्ध 'प्रोपेगंडा' म्‍हटले आहे. हाफिजचे वकील अॅड. ए. के. डोगरा यांनी सईदकडून पिटीशन दाखल करताना हा चित्रपट म्‍हणजे 'पाकिस्तान आणि जेयूडीच्‍या विरुद्ध विष आहे,' असा आरोप केला. '' हा चित्रपट 2008 मध्‍ये मुंबईवर झालेल्‍या हल्‍ल्‍यावर आधारित असून, यातून जेयूडीची जागतिक पातळीवर दहशतवादी म्‍हणून बदनामी करण्‍यात येत आहे, '' असेही त्‍यांनी म्‍हटले.
यावर सैफ म्हणतो, 'आमचा सिनेमा सत्यता सांगतो, सर्वांना ठाऊक आहे, की 26/11साठी कोण जबाबदार होते. हा हल्ला घडवून आणणारे दहशतवादी पाकिस्तानमध्ये लपलेले आहेत. मग आम्ही का नको सिनेमानव्दारे सत्यता पुढे आणवी? सर्व सत्य देशवाशियांसमोर आहे, तर आम्ही यावर सिनेमा का करू नये. आम्हाला माहित आहे, या सिनेमामुळे पाकिस्तानमधील काही लोकांना त्रास होईल.'
दहशतवादी का गेला न्यायालयात?
सैफने सांगितले, 'एक असा दहशतवादी जो वान्टेड आहे आणि अशाप्रकारच्या मागणीसाठी न्यायालयात जातो, तर हे एक विनोदच आहे. असे कृत्य हेदेखील स्पष्ट करते, की पाकिस्तानमध्ये एक दहशतवादीसुध्दा तक्रार दाखल करू शकतो.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, या पत्रकार परिषदेत उपस्थित असलेल्या सेलेब्सचे फोटो...