आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूडच्या प्रसिद्ध निर्मात्याच्या आईचे निधन, अखेरचा निरोप द्यायला पोहोचले कलाकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फिरोज नाडियाडवाला यांच्या आईची अंत्ययात्रा, शेजारी - परेश रावल - Divya Marathi
फिरोज नाडियाडवाला यांच्या आईची अंत्ययात्रा, शेजारी - परेश रावल

मुंबईः बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माते फिरोज नाडियाडवाला यांना मातृशोक झाला आहे. १३ एप्रिल रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने फिरोज यांच्या मातोश्रींची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले.

फिरोज हे निर्माते-दिग्दर्शक साजिद नाडियाडवालांचे चुलत भाऊ आहेत. अंत्यसंस्कारात साजिद नाडियाडवालांसह परेश रावल, साजिद खान, अमजद खान, अनीज बज्मी पोहोचले होते.
फिरोज नाडियाडवाला यांनी वेलकम बॅक, आरक्षण, वेलकम, दिवाने हुए पागल, आवारा पागल दिवाना, फिर हेरा फेरी यांच्यासह अनेक गाजलेल्या सिनेमांची निर्मिती केली आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, फिरोज नाडियाडवालांच्या मातोश्रींना अखेरचा निरोप देतानाची छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...