मुंबई : अभिनेता सलमान खानने 1993 मधील मुंबई बॉम्स्फोटातील गुन्हेगार याकूब मेमनला फाशी देण्याचा विरोध केला आहे. सलमानने शनिवारी रात्री उशीरा 49 मिनिटांत एकूण 14 ट्वीट करून याकूबला पाठिंबा दर्शवला. त्याने पहिला ट्विट रात्री 1:52 AM वाजता आणि शेवटचे ट्विट रात्री 2:41 AM वाजता केले. निरापराध्याचा मृत्यू म्हणजे मानवतेची हत्या असल्याचे सलमानने म्हटले आहे. त्याच्या या ट्विटवरुन वादंग निर्माण झाले आहे. अनेकांनी सलमानच्या या ट्विटवर विरोध दर्शवला आहे.
सलमानने केलल्या ट्विटवर त्याचे वडील आणि प्रसिद्ध स्क्रिप्ट रायटर सलीम खान यांनी सलमानला खडे बोल सुनावले आहे.
''सलमान खान हा काही या विषयातला तज्ञ नाही, त्याने अशी प्रतिक्रिया द्यायला नको होती'', असे खडे बोल वडील सलीम खान यांनी सलमानला सुनावले आहेत.
याकूबऐवजी भारतातून पळून गेलेल्या टायगरला फाशी द्यावी अशी मागणी त्याने केली. टायगर पाकमध्ये असेल तर नवाझ शरीफ यांनी त्याला भारताकडे सुपूर्त करावे असेही त्याने म्हटले आहे.
पुढील स्लाईड्समध्ये वाचा, सलमानने केलेले 14 ट्विट्स...