आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानचे वडील मोदींच्या बचावात, म्हणाले- रहायचे असेल तर मुस्लिमांनी देशाचा सन्मान राखावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेता सलमान खान वडील सलीम खान यांच्यासोबत - Divya Marathi
अभिनेता सलमान खान वडील सलीम खान यांच्यासोबत
मुंबई - देशातील असहिष्णुतेच्या मुद्यावर उठलेल्या वादळात बॉलिवूड स्टार सलमान खानचे वडील सलीम खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा बचाव केला आहे. एक इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले आहे, की मोदी जराही धर्मांध नाहीत. सलीम खान म्हणाले, 'जगात भारताएवढा चांगला देश दुसरा कोणताही नाही. मुस्लिमांना या देशात राहायचे असेल तर त्यांनी देशाचा सन्मान राखला पाहिजे.' भारतातील मुस्लिम पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण, इराकमध्ये राहायला इच्छूक असतील का ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
आपल्या काळातील प्रसिद्ध स्क्रिप्ट रायटर सलीम खान म्हणाले, 'नरेंद्र मोदींना मी जराही धर्मांध मानत नाही. मला विश्वास आहे की सबका साथ-सबका विकास यावरच त्यांचाही विश्वास आहे. जगात अल्पसंख्याकांना राहाण्या योग्य भारतापेक्षा दुसरा कोणताही देश असू शकत नाही. मी मुस्लिमाना विचारू इच्छितो की ते पाकिस्तान किंवा अफगाणिस्तान, इराण, इराकमध्ये राहू शकतात का? जर भारतच एकमेव देश आहे जिथे तुम्ही राहू इच्छिता. तर या देशाचा आणि येथील संस्कृतीचा तुम्ही आदर केला पाहिजे. आपसातील प्रेम वाढविले पाहिजे.'

पुरस्कार परत करणाऱ्यांचे समर्थन
काही लेखक आणि कलाकारांनी असहिष्णुतेच्या मुद्यावर पुरस्कार परत केले त्याचे समर्थन करतना सलीम खान म्हणाले, सरकारला असहिष्णुतेविरोधात कडक भूमिका घेतली पाहिजे. ते म्हणाले , 'एक मान्य केले पाहिजे की कुठे ना कुठे काही तरी गडबड आहे. ही समस्या चर्चेतून सोडवली पाहिजे.ज्यांनी पुरस्कार परत केले ते लोक ज्ञानी आणि समजदार आहे. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे आणि सत्तेत बसलेल्यांनी त्यावर उपाय शोधला पाहिजे.'

पुरस्कार परत करणाऱ्यांचे समर्थन
काही लेखक आणि कलाकारांनी असहिष्णुतेच्या मुद्यावर पुरस्कार परत केले त्याचे समर्थन करतना सलीम खान म्हणाले, सरकारला असहिष्णुतेविरोधात कडक भूमिका घेतली पाहिजे. ते म्हणाले , 'एक मान्य केले पाहिजे की कुठे ना कुठे काही तरी गडबड आहे. ही समस्या चर्चेतून सोडवली पाहिजे.ज्यांनी पुरस्कार परत केले ते लोक ज्ञानी आणि समजदार आहे. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे आणि सत्तेत बसलेल्यांनी त्यावर उपाय शोधला पाहिजे.' त्यासोबतच त्यांनी पुरस्कार वापसी करणाऱ्या बुद्धिजीवींनाही सल्ला दिला. ते म्हणाले, ज्या लोकांनी पुरस्कार परत केले त्यांनी त्याआधी एकदा सरकारसोबत चर्चा करायला पाहिजे होती. त्यांनी सरकारला पत्र लिहिले पाहिजे होते. एफटीआयआयच्या मुद्यावर खान म्हणाले, 'गजेंद्र चौहानांना आत्मसन्मान असेल तर त्यांनी स्वतः राजीनामा दिला पाहिजे. कारण ज्यांच्यासोबत त्यांना काम करायचे आहे त्या लोकांना ते मान्य नाही.'
बातम्या आणखी आहेत...