आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Salim Khan Speaks For The First Time After Salman Got Exonerated In Hit And Run Case

सलीम खान म्हणाले, 'खटल्यादरम्यान सलमानला करावे लागले 20 ते 25 कोटी रुपये खर्च'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : सलीम आणि सलमान खान - Divya Marathi
फाइल फोटो : सलीम आणि सलमान खान
हिट अँड रन प्रकरणातून अभिनेता सलमान खानची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर त्याचे वडील सलीम खान यांनी पहिल्यांदाच महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. या 13 वर्षांत सलमानला अनेक अडचणींचा सामना करावा लागला, असे त्यांनी सांगितले. इतकेच नाही तर त्याने या प्रकरणी 20 ते 25 कोटी रुपये खर्च केल्याची माहिती सलीम खान यांनी दिली आहे.
10 डिसेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाने 49 वर्षीय अभिनेता सलमानची हिट अँड रन प्रकरणी निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणी सात महिन्यापूर्वी सत्र न्यायालयाने सलमानला दोषी ठरवत 5 वर्षाच्या सक्त कारावासाची शिक्षा सुनावली होती. सलमानशी भावनिक जवळीक असलेला प्रत्येक जण या निकालामुळे आनंदी आहे, असेही सलीम खान म्हणाले.
लोकांना वाटते या प्रकरणातून सलमानने पळवाट काढली, मात्र तसे नाही. त्याने काही दिवस तुरुंगात घालवले आहेत. शिवाय या प्रकरणावर त्याने 20 ते 25 कोटी रुपयेही खर्च केले आहेत. याहीपेक्षा या प्रकरणादरम्यान त्याला आणि आम्हा प्रत्येकाला जो मानसिक ताण होता त्याचे काय, असा सवाल त्यांनी यावेळी विचारला.
पुढे वाचा, काय होते प्रकरण....
बातम्या आणखी आहेत...