आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सलमानचे वडील म्हणाले, \'...तर मी मुस्लिम नाही\' असा केला ढाका हल्ल्याचा निषेध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे वडील आणि प्रसिध्द पटकथा लेखक सलीम खान यांनी ढाका दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे. 'जर दहशतवादी स्वत:ला मुस्लीम म्हणत असतील, तर मी मुस्लीम नाही', असे सलीम म्हणाले. सलीम खान यांनी रविवारी (3 जुलै) रात्री ट्वीट करुन बांगलादेशातील ढाका दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त केला.
सलीम यांनी टि्वटमध्ये म्हटले, 'जगभरातील दहशतवादी हल्ल्यातील हल्लेखोर स्वत:ला मुस्लीम सांगतात. मुस्लीम व्यक्ती पैगंबर आणि कुराणचे अनुकरण करतो. त्यामुळे मला माहित नाही, हे दहशतवादी कशाचे अनुकरण करतात. पण ते इस्लामचे अनुकरण करत नाहीत, हे नक्की. जर ते मुस्लीम आहेत, तर मी मुस्लिम नाही. पैगंबर सांगतात, एका निर्दोष व्यक्तीला मारणे म्हणजे माणुसकीला मारण्यासारखे आहे.'
सलीम खान पुढे म्हटले, 'ईदची प्रार्थना तेव्हाच पूर्ण होणार नाही, जेव्हा दहशतवादी हल्ल्यांसारख्या वाईट कामांचा आपण निषेध करत नाही.' यापूर्वी बांगलादेशचे पंतप्रधान शेख हसीना यांनीही म्हटले होते की, रमजानमध्ये निर्दोष व्यक्तींना मारणारे मुस्लीम कसे?
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा सलीम खान यांची केलेले टि्वट...
बातम्या आणखी आहेत...