आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अखेर मलायका-अरबाजचा घटस्फोटासाठी अर्ज, 23 वर्षांनंतर होणार विभक्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : अभिनेता सलमान खानचा भाऊ अरबाज खान आणि वहिनी मलायका अरोरा खान यांनी अखेर कायदेशीररित्या विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. वांद्र्याच्या फॅमिली कोर्टात त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून दोघांमध्ये कुरबुरी सुरु असल्यानं घटस्फोटाची चर्चा सुरु होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून दोघं पुन्हा एकत्र पाहायला मिळाल्याने चाहत्यांना आनंद झाला होता. परंतु आता दोघांनीही परस्पर सामंजस्यानं घटस्फोटासाठी अर्ज केला आहे.
मलायकाला अनेकांनी समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र ती कोणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. त्यामुळे अरबाज-मलायकाच्या 18 वर्षांचा सुखी संसार संपुष्टात येत आहे. काही महिन्यांपूर्वी मलायका खान कुटुंबाच्या ‘गॅलक्सी’तील घराला राम राम ठोकून मुलांसोबत खारमधील अपार्टमेंटमध्ये राहण्यास गेली होती. याच अपार्टमेंटमध्ये मलायकाची बहीण अमृता राहते. मात्र ती बहिणीकडे गेली नाही. इतकंच नाही तर मलायका अमृताच्या दुबईतील बर्थ डे पार्टीलाही गेली नव्हती. या पार्टीला अरबाज आल्यामुळेच मलायका गेली नव्हती. याशिवाय नणंद म्हणजे सलमानची बहिण अर्पिताच्या डोहाळे जेवण समारंभालाही उपस्थित राहिली नव्हती.
सलमानकडून पॅच अपचा प्रयत्न
अरबाज आणि मलायका एकमेकांपासून दुरावत असल्याची बातम्या आल्यानंतर, त्यांच्यातील दुरावा दूर करण्यासाठी सलमान खान मदत करत होता. सलमानने यासाठी 2 मार्चला फॅमिली पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीला त्याने बहिण अमृता आणि तिचा पती, मलायकाची आई, तसंच मलायकांचे जवळचे नातेवाईक शकील लडाक यांना आमंत्रित केलं होतं. मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही. यानंतरही सलमानने जिद्द सोडली नव्हती. त्याने कलर्स गोल्डन अवॉर्डमध्येही मलायकाच्या बाजूला बसून चर्चा केली होती.
पुढे वाचा, सलीम खान यांचा हस्तक्षेप नाही...
वादग्रस्त जाहिरातीतून एकत्र आले होते अरबाज-मलायका...
अरबाजपेक्षा सहा वर्षांनी लहान आहे मलायका...
मलायकावर खूप प्रेम करतो – अरबाज आणि सोबतच बघा मलायका-अरबाजचे फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...