आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bajrangi Bhaijaan Star Beats Airlift Actor Akshay Kumar By Paying The Highest Advance Tax This Fiscal

आयकर भरण्यात सलमानने अक्षयला पछाडले, जमा केला 20 कोटींचा अॅडव्हान्स टॅक्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः आयकर भरण्याच्या बाबतीत अभिनेता सलमान खान अव्वल ठरला आहे. सलमानने आयकर विभागाकडे 20 कोटी रुपये अॅडव्हान्स टॅक्स म्हणून भरले आहेत. बॉलिवूडमधील एखाद्या स्टारने भरलेली ही सर्वात जास्त रक्कम आहे. गेल्यावर्षीपर्यंत अभिनेता अक्षय कुमार टॅक्स भरण्यात नंबर वनवर होता. मात्र आता चित्र पालटले आहे. अक्षय दुस-या तर सलमान पहिल्या स्थानावर आला आहे. यावर्षी अक्षयने 16 कोटी रुपये टॅक्स म्हणून जमा केले आहेत.
गेल्या वर्षी सलमानचे 'बजरंगी भाईजान', 'प्रेम रतन धन पायो' या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. सलमान बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेताही ठरला आहे. त्यामुळेच सलमान बॉक्स ऑफिसच नाही तर कमाईच्या बाबतीतही किंग ठरलाय. लागोपाठ हिट सिनेमांनी मालामाल झालेल्या सलमानने कर भरण्यातही मग कसर सोडली नाही.
पुढे वाचा, सलमान आणि अक्षय पाठोपाठ अमिताभ बच्चन, रणबीर कपूर आणि शाहरुख खानने किती टॅक्स भरला...