आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6 मे रोजी येणार सलमानच्या HIT & RUN CASEचा निर्णय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- सलमान खान)

मुंबई - बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या बहुचर्चीत हिट अँड रन प्रकरणाचा निकाल आता 6 मे रोजी लागण्याची शक्यता आहे. मुंबई सत्र न्यायालयाने या प्रकरणाचा निर्णय देण्यासाठी मंगळवारी तारीख निश्चित केली. या प्रकरणात सलमान दोषी ठरला तर त्याला दहा वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता आहे.
या प्रकरणात कोर्टात 27 साक्षीदारांचे जबाब नोंदवले गेले आहेत. त्यामध्ये सलमानच्या ड्रायव्हरपासून रक्ताची चाचणी करणा-या डॉक्टरांपर्यंत सर्व साक्षीदारांचा समावेश होता. सर्वात शेवटी कोर्टाने सलमानचा ड्रायव्हर अशोक सिंहचा जबाब नोंदवला होता. ड्रायव्हर अशोकने कोर्टात साक्ष देताना सांगितले होते, की घटनेवेळी तो स्वत: SUV चालवत होता आणि सलमान बाजूच्या सीटवर बसलेला होता. त्यापूर्वी सलमानने कोर्टाला सांगितले होते, की घटनेवेळी तो गाडी चालवत नव्हता.
सलमान दोषी सिध्द झाल्यास 10 वर्षांची शिक्षा-
सलमान खानच्या 'हिट अँड रन' प्रकरणाचा 6 मे रोजी निकाल येणार आहे. पुरावे आणि कोर्टाने नोंदवलेले जबाबाच्या आधारावर सलमान दोषी ठरल्यास त्याला 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते.
काय आहे प्रकरण-
28 सप्टेंबर 2002 रोजी सलमान खानने आपल्या एसयूव्हीने फुटपाथवर झोपलेल्या पाच लोकांना चिरडले होते. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू आणि इतर चार व्यक्ती गंभीर जखमी झाले होते. सलमानवर आरोप आहे, की सलमान स्वत: नशेत गाडी चालवत होता. त्याच्याकडे वाहन चालविण्याचा वैध परवाना नव्हता आणि घटना घडल्यानंतर तो तिथून पळून गेला होता. त्यामुळे या प्रकरणाला 'हिट अँड रन' म्हटले आहे.