आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानच्या बर्थडेला यांनी केला होता 50 Kgचा केक, किंमत 1 लाख रुपये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
50 व्या बर्थडेला केक कापताना सलमान, उजवीकडे केकसोबत पूजा ढिंगरा आणि शिखा मुरारकर - Divya Marathi
50 व्या बर्थडेला केक कापताना सलमान, उजवीकडे केकसोबत पूजा ढिंगरा आणि शिखा मुरारकर
मुंबईः गेल्या अडीच वर्षांपासून मुंबईतील एका बेकरीत काम करणा-या शिखा मुरारका हिने आत्तापर्यंत अनेक सेलिब्रिटींसाटी केक बनवले आहेत. डिसेंबर 2015 मध्ये सलमान खानच्या 50 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिखाने पूजा ढिंगरा आणि श्वेता समैया यांच्यासोबत मिळून खास केक बनवला होता. बातम्यांनुसार 50 किलो वजनी या केकची किंमत तब्बल एक लाख रुपये इतकी होती. divyamarathi.com शी बातचित करताना शिखाने आपल्या करिअरशी निगडीत अनुभव शेअर केले.
विद्या बालनच्या नव-याने केली होती स्पेशल केकची मागणी

सिद्धार्थ रॉय कपूर यांनी त्यांची पत्नी विद्या बालन हिच्यासाठी खास केकची मागणी केली होती. शिखाने सांगितले, विद्याच्या वाढदिवसाच्या एका दिवसाआधी सिद्धार्थ यांनी मला फोन करुन अगदी साधा केक हवा असल्याचे सांगितले. त्यांना कोणत्याही प्रकारचे फॅन्सी डिझाइन नको होते. 1 जानेवारी रोजी विद्याने 38 वा वाढदिवस साजरा केला होता.
टीना अंबानींनी बनवून घेतला होता आराध्या बच्चनसाठी खास केक

2014 मध्ये अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांची लेक आराध्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिखाने रखास केक तयार केली होता. हा केक टीना अंबानींनी ऑर्डर केला होता. याविषयी शिखाने सांगितले, ''टीना अंबानी यांनी मला फोन करुन आराध्यासाठी खास केक तयार करण्यास सांगितला होता. तेव्हा मी तीन किलोचा केक बनवला होता, त्याची थीम टेडी बिअर होती.''
लंडनहून शिकली शुगर क्राफ्टिंगची कला

शिखाने शुगर क्राफ्टिंगचे शिक्षण खास लंडनच्या आर्टिस्टकडून घेतले आहे. तिने सांगितले, ''आर्ट शिकल्यानंतर मी आले आणि येथे सेलिब्रिटी शेफ पूजा ढिंगराच्या बेकरीत काम करायला सुरुवात केली. रंजक बाब म्हणजे पूजाच्या बेकरीत सर्वप्रथम सेलिब्रिटी केकची ऑर्डर सोनम कपूरच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आली होती. मी तो केक बनवला होता. आणि त्यावर शुगर क्राफ्टिंग आर्टद्वारे सोनमने कान्समध्ये परिधान केलेल्या एका गाऊनचा लूक दिला होता.''
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, शिखाने सेलिब्रिटींसाठी तयार केलेल्या केकची खास
बातम्या आणखी आहेत...