आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहिणीच्या रिसेप्शनला फॅमिलीसोबत पोहोचला सलमान, समोर आले PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
[आई सलमा (डावीकडून पहिल्या), बहीण अर्पिता आणि नातेवाईकांसोबत सलमान खान]
धर्मशालाः बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान त्याची लाडकी बहीण अर्पिता खानच्या रिसेप्शनमध्ये सहभागी होण्यासाठी धर्मशाला येथे पोहोचला. यावेळी तो त्याच्या आगामी 'बजरंगी भाईजान' या सिनेमातील लूकमध्ये दिसला. रिसेप्शनच्या तयारीची छायाचित्रे सोशल नेटवर्किंग साइट्सवर शेअर करण्यात आली आहेत. या छायाचित्रांमध्ये सलमान खान बहीण अर्पिता, आई सलमा, भाऊ सोहेल खान आणि इतर नातेवाईकांसोबत दिसत आहे.
अर्पिताचे लग्न दिल्लीस्थित व्यावसायिक आयुष शर्मासोबत गेल्यावर्षी 18 नोव्हेंबर रोजी हैदराबाद येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडले होते. त्यानंतर 21 नोव्हेंबर रोजी खान कुटुंबीयांच्यावतीने मुंबईतील हॉटेल ताज लँड्स अँडमध्ये एक जंगी रिसेप्शन पार्टी आयोजित करण्यात आली होती. या रिसेप्शनला बी टाऊनमधील अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती.
लग्नाच्या सहा महिन्यानंतर आयुष आणि त्याचे कुटुंब त्यांचे वडिलोपार्जित घर असलेल्या मंडी येथे आले. येथे अर्पिता आणि आयुषचे रिसेप्शन ठेवण्यात आले आहे. अर्पिता या रिसेप्शनसाठी खूप एक्साइटेड आहे. तिने अलीकडेच पायावर मेंदी लावल्याचे छायाचित्र सोशल साइटवर शेअर केले आहे. या छायाचित्रासोबत तिने ट्विट केले, "Mehendi & the celebrations go on ! Reception in Mandi HP inlaws hometown"
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, रिसेप्शन, अर्पिताने शेअर केलेले मेंदी आणि हिमाचल प्रदेशमध्ये पोहोचल्यानंतरची सलमानची काही छायाचित्रे...