आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळवीट शिकार प्रकरणी सलमानला झटका, राजस्थान हायकोर्टाने विनंती फेटाळली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः अभिनेता सलमान खान)

'हिट अँड रन' खटल्यात अभिनेता सलमान खानला मुंबई हायकोर्टाने मोठा दिलासा दिला. मात्र काळवीट शिकार प्रकरणी त्याला आज (गुरुवारी) झटका बसलाय. पाच साक्षीदारांची साक्ष कनिष्ठ कोर्टात पुन्हा नोंदवण्याची त्याची विनंती राजस्थान हायकोर्टाच्या जोधपूर खंडपीठाने फेटाळून लावली आहे. 1998 मध्ये 'हम साथ साथ है' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान सलमान खानने विनापरवाना शस्त्र बाळगून काळवीटाची शिकार केल्याचे उघड झाले होते. या खटल्यात सलमानला राजस्थानमधील कनिष्ठ कोर्टाने पाच वर्षांची शिक्षाही ठोठावली होती. मात्र राजस्थान हायकोर्टाने या शिक्षेला स्थगिती दिली होती. त्याविरोधात राजस्थान सरकारने सुप्रीम कोर्टात दाद मागितली आणि तिथे सलमानला दणका बसला होता. त्याच्या शिक्षेवरील स्थगिती उठवून सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण पुन्हा हायकोर्टाकडे पाठवले होते.
सलमानच्या वकिलांनी जोधपूर हायकोर्टात अर्ज केला होता. बचाव पक्षाच्या पाच साक्षीदारांची साक्ष पुन्हा नोंदवण्यासाठी त्यांनी याचिका दाखल केली होती. ती आज कोर्टाने फेटाळली आहे. काळवीट शिकार प्रकरणी सलमानवर शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल आहे. तसेच, दोन वेळा त्याला तुरुंगवास भोगावा लागला आहे.
बातम्या आणखी आहेत...