आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Sex शिवाय एक महिनाभरही राहू शकत नाही सलमान, अरबाजने केला खुलासा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलमान खान. इनसेट अरबाज खान. - Divya Marathi
सलमान खान. इनसेट अरबाज खान.
मुंबई - सलमान खानने तीन वर्षांपूर्वी 'कॉफी विथ करण 4' मध्ये स्वतः व्हर्जिन असल्याचा दावा केला होता. पण याच शोच्या 5 व्या सिझनमध्ये सलमानचा भाऊ अरबाजने धक्कादायक खुलासा केला आहबे. 'कॉफी विथ करण 5' च्या ताज्या प्रोमोमध्ये अरबाज खान सलमान सेक्स आणि वर्कआऊटशिवाय महिनाभरही राहू शकत नाही, याचे संकेत देत असल्याचे पाहायला मिळाले.

सलमान अजूनही स्वतःला समजतो व्हर्जिन..
प्रोमोमध्ये करण सलमान आणि अरबाजबरोबर रॅपिडफायर प्रश्न विचारताना दाखवले आहे. यावेळी जेव्हा करनने विचारले की, कोण एक महिना विना सेक्सचे चॅलेंज स्वीकारू शकत नाही? या प्रश्नाच्या उत्तरात अरबाजने सलमानचे नाव घेतले. त्यावर सलमान हसला आणि त्याला म्हणाला, काय म्हणतोय. त्यानंतर करणला सलमान असे म्हणताना दिसले की, त्याने काय सांगितले माहिती नाही पण मी वर्कआऊट आणि मेकआऊटशिवाय महिनाभर राहू शकत नाही. प्रॉब्लेम आहे.

तीन वर्षांपूर्वी काय म्हणाला होता सलमान
कॉफी विथ करण 4 मध्ये सलमानला बहुतांश प्रश्न हे त्याच्या खासगी जीवनाबाबत विचारण्यात आले होते. पण सल्लू यावेळी वेगळ्याच मूडमध्ये होता. एका प्रश्नाचे उत्तर देताना तो म्हणाला की, मी व्हर्जिन आहे. एवढ्यावरच न थांबता सलमान म्हणाला की, मी माझ्या गर्लफ्रेंडबरोबर खोटंही बोललो आहे. एकटे झोपायला आवडतचे असे सलमान म्हणाला. अनेक एक्स गर्लफेंडबरोबर बोलत नसल्याचेही सलमान म्हणाला होता. त्या मुलींच्या नावांची माध्यमांमधून चर्चा व्हायला नको म्हणून तसे करतो असे तो म्हणाला होता.
पुढील स्लाइड्सवर पाहा, करणने विचारलेले प्रश्न आणि त्यावर अरबाज आणि सलमानची उत्तरे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...