आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राखी बांधून घेण्यासाठी गर्लफ्रेंड युलियासोबत बहिणीच्या घरी पोहोचला सलमान, बघा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः 18 ऑगस्ट रोजी सगळीकडे रक्षाबंधनाचा सण मोठ्या आनंद आणि उत्साहात साजरा झाला. बॉलिवूडचा दबंग अर्थातच अभिनेता सलमान खाननेसुद्धा आपल्या लाडक्या बहिणींसोबत हा खास दिवस सेलिब्रेट केला. सलमानच्या बहिणी अर्पिता आणि अलविरा यांच्यासोबत त्याची मानलेली बहीण आणि अभिनेता पुलकित सम्राटची एक्स वाईफ श्वेतानेसुद्धा सलमानला राखी बांधली. या तिघी बहिणींनी आपल्या लाडक्या भावासाठी सारख्या राख्या आणल्या होत्या. या सेलिब्रेशनची छायाचित्रे श्वेता आणि अर्पिताने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहेत. हा खास दिवस सेलिब्रेट करण्यासाठी सलमानसोबत त्याचे वडील सलीम खान, अलविरा आणि तिचे पती अतुल अग्निहोत्री, सोहेल खान आणि त्याची पत्नी सीमा, सलमानची गर्लफ्रेंड युलिया अर्पिताच्या घरी पोहोचले होते.
यावेळी सलमानसोबत त्याचा धाकटा भाऊ सोहेलसुद्धा दिसतोय. मात्र अरबाज खान या सेलिब्रेशनमध्ये अनुपस्थित दिसला. शिवाय अर्पिताचा मुलगा आहिलचा हा पहिलाच सण आहे. चिमुकल्या आहिलला अलविराची मुलीने राखी बांधली.
सलमानने अर्पिताला गिफ्ट केले होते घर...
सलमानने अर्पिताला तिच्या लग्नात हा तीन बेडरुमचा फ्लॅट गिफ्ट केला होता. वांद्रास्थित हा फ्लॅट सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटपासून केवळ पाच मिनिटांच्या अंतरावर आहे. या फ्लॅटची किंमत 16 कोटी असून सी फेस अपार्टमेंट आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा, अर्पिताच्या घरी झालेल्या राखी सेलिब्रेशनची ही खास छायाचित्रे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...