आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान खानचा राज ठाकरेंना फोन नाही, मनसेकडून स्पष्टीकरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटोः सलमान खान, राज ठाकरे - Divya Marathi
फाइल फोटोः सलमान खान, राज ठाकरे
मुंबईः अभिनेता सलमान खान आणि राज ठाकरे यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध सगळ्यांना ज्ञात आहेत. राज यांच्याबरोबर असलेल्या मैत्रीचा आधार घेत सलमानने त्यांना दुरध्वनी करून 'रईस' आणि 'ऐ दिल है मुश्किल' या सिनेमांचे प्रदर्शन थांबवू नये, अशी विनंती केल्याची चर्चा होती. उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यास केल्या जाणा-या विरोधावरून सलमानने राज यांना फोन केल्याचे म्हटले जात होते. मात्र, राज ठाकरे आणि सलमान यांची भेट झालेली नाही. तसेच, फोनवरूनही या दोघांमध्ये कोणताच संवाद न झाल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेने स्पष्ट केले आहे. ‘ऐ दिल है मुश्किल’ या सिनेमात पाकिस्तानी कलाकार फवाद खान आणि 'रईस'मध्ये पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान असल्यामुळे त्यास विरोध केला जात आहे.

पुढे वाचा, पत्रकार परिषद घेऊन काय म्हणाले, महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...