आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bollywood: 100 कोटी मानधन घेणारा सलमान खान ठरला एकमेव अभिनेता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुल्तान या चित्रपटात सलमानने रेसलरची भूमिका बजावलेली आहे. - Divya Marathi
सुल्तान या चित्रपटात सलमानने रेसलरची भूमिका बजावलेली आहे.
मुंबई - बॉलीवूडमध्ये १०० कोटींचा व्यवसाय करणारे अनेक चित्रपट तयार झाले आहेत, पण १०० कोटी मानधन घेणारा एकमेव अभिनेता आहे तो म्हणजे सलमान खान. ‘सुलतान’साठी सलमान खानने निर्माता स्टुडिओ यशराज फिल्म्सकडून मानधन घेतले नाही, पण नफ्यात ५०-५० टक्के वाटा ठेवला आहे.
‘सुलतान’ने भारतीय बाजारात आतापर्यंत २९७ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. तज्ज्ञांच्या मते, लवकरच हा चित्रपट ३०० कोटींचा आकडा पार करेल. चित्रपट निर्मितीसाठी ७० कोटी आणि प्रिंट व प्रमोशनसाठी २५ कोटी असे ९५ कोटी या चित्रपटासाठी लागले आहेत. निर्मितीसाठी लागलेले ९५ कोटी रुपये काढून घेतल्यानंतर नफ्याची जी रक्कम उरेल त्याची अर्धी-अर्धी रक्कम वाटून घेण्याचा निर्णय यशराज फिल्म्स आणि सलमान यांनी घेतला होता. चित्रपटाच्या टीव्ही प्रदर्शनाचे सॅटेलाइट अधिकार सोनी टीव्ही चॅनलने ६२ कोटींत खरेदी केले आहेत. १८ कोटी रुपये पेड इंटरनेट डाऊनलोडिंगच्या खात्यातून आले आहेत.

संगीताच्या हक्काचे १५ कोटी आणि इतर हक्कांच्या बदल्यात २ कोटींची रक्कम मिळाली आहे. भारतीय चित्रपटगृहांत या चित्रपटाने आतापर्यंत २९७ कोटींचा व्यवसाय केला आहे. तो ३०० कोटींवर जाईल. त्यातील चित्रपटगृह मालकांचा वाटा काढून घेतल्यानंतर यशराज फिल्म्सच्या हाती येतील १५० कोटी रुपये. परदेशी बाजारात सुरुवातीच्या तीन आठवड्यांत चित्रपटाने १४५ कोटी रुपये कमावले आहेत. हा आकडा १५० कोटींपेक्षा जास्त असेल, असे सूत्रांनी सांगितले.
परदेशातील उत्पन्नातून विविध कर आणि व्हॅट वगळल्यास निर्मात्याच्या हाती ४० टक्के रक्कम येते. म्हणजे परदेशी बाजारातून ‘सुलतान’ला ६० कोटी रुपये मिळतील. हक्क आणि देश-परदेशातील चित्रपटगृहांतील या उत्पन्नातून एकूण ३०७ कोटी रुपये मिळाले. त्यापैकी निर्मितीचे ९५ कोटी रुपये काढून घेतल्यानंतर उरलेल्या २१२ कोटींच्या रकमेचे समान वाटप सलमान आणि यशराजच्या आदित्य चोपडा यांच्यात होईल. म्हणजे सलमानला मानधन म्हणून मिळतील १०६ कोटी. ही रक्कम त्याला चित्रपटाच्या पुढील दोन महिन्यांच्या कामगिरीनुसार मिळेल.
एवढेच नाही तर सलमानची कमाई आणखी वाढणार आहे. जपान, जर्मनी, पोलंड यांसारख्या अनेक देशांत हा चित्रपट स्थानिक भाषेत डब व्हर्जनसह प्रदर्शित होईल. चित्रपटगृह व टीव्ही चॅनलच्या माध्यमातून प्रसारणाच्या बदल्यातही चित्रपटाला किमान २० कोटी रुपये मिळतील. त्यापैकी १० कोटी सलमानला मिळतील. म्हणजे त्याला ११६ कोटी रुपये मानधन मिळेल.
पुढील स्लाईडवर वाचा... आमिरने घेतले होते ७० कोटी... वाचा कोणत्या चित्रपटासाठी..