आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानने दिले त्याच्या फॅनला गिफ्ट, पाहा, चाहत्यासाठी भाईजानने बनवले स्केच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलमान खानसोबत त्याचा चाहता आनंद आणि स्केच
सलमान खानला एकदा तरी भेटावं, त्याला डोळे भरून पाहावं, त्याच्यासोबत फोटो काढावा, त्याच्याशी गप्पा माराव्यात. आणि सलमानला पाहून जसा आपल्याला आनंद होतो. तसाच भाईला आपण त्याचे सर्वात चांगले चाहते आहोत, असं वाटावं, असं स्वप्न प्रत्येक चाहत्याचं असतं. मुंबईत राहणा-या एका चाहत्याचे हे स्वप्न नुकतंच पूर्ण झालंय.
या चाहत्याचे नाव आहे, आनंद वाशी. ३१ वर्षांचा आनंद अंधेरीतल्या एका शाळेत शिक्षक आहे. पण जेवढे त्याचे विद्यार्थी सलमान खानला पाहून खूश होतात, तेवढाच हा सूध्दा सल्लूमियाँला पाहिलं, की मुलांत मुल होतो. बाकी अनेक चाहत्यांसारखा आनंदसुध्दा सलमान भाईचे चित्रपट फस्ट डे फस्ट शोच पाहतो. मग पहिला शो सकाळी सातचा का असेना. सलमानसारखी लॉकेट घालतो. भाईला फॉलो करण्याचा पूर्ण प्रयत्न करतो.
गेले कित्येक वर्ष आपल्या भाईजानला भेटायची आनंदची इच्छा शेवटी नुकतीच पूर्ण झाली. 'बजरंगी भाईजान' झळकलाय म्हटल्यावर आनंद वाशीने आपल्या सुपरस्टारसाठी एक बजरंग बलीची छोटी मूर्ती आत असलेली सुंदरशी फोटो फ्रेम बनवून घेतली. इनले वर्कमध्ये बनलेली सागाची बजरंगी बलीची मुर्ती आनंदने भाईसाठी खास मैसुरहून बनवून घेतली. आणि सलमानला भेटताच त्याला ती गिफ्ट दिली.
समोर स्मितहास्य करणा-या राजबिंड्या सलमानला पाहून, न राहवून आनंदने एक प्रश्नही विचारला. आनंद सांगतो, “ मी भाईला विचारलं, आता पन्नाशीकडे झुकणा-या तुमची कांती एवढी तजेलदार आहे. पण आम्ही पाहा... मी तिशीत प्रवेश केलाय, पण मी तुमच्यापेक्षा वयाने मोठा वाटतो. हे कसे?, माझ्या या प्रश्नावर भाई त्याच्या खास शैलीत हसले.”
पुढील स्लाइडवर वाचा, काय उत्तर दिले सलमान खानने आपल्या चाहत्याला