एन्टरटेन्मेंट डेस्कः अभिनेता सलमान खान आपल्या आगामी 'सुल्तान' या सिनेमासाठी बरीच मेहनत घेतोय. शूटिंग सेटवरील काही छायाचित्रे समोर आली आहेत, ज्यामध्ये सलमान भूमिकेसाठी घाम गाळताना दिसतोय. सिनेमाचे दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी सलमानचे एक नवीन छायाचित्रे सोशल मीडियावर ट्विट केले असून यामध्ये शर्टलेस सलमानचा टफ लूक बघायला मिळतोय. या सिनेमात सलमान रेसलरची भूमिका साकारतोय.
तसं पाहता, यापूर्वी अनेक सिनेमांमध्ये सलमान शर्टलेस होताना दिसला आहे. मात्र या सिनेमाचे वैशिष्ट्य वेगळे आहे. आता सलमान 50 वर्षांचा झाला आहे, मात्र वाढत्या वयाचा परिणाम मुळीच त्याच्यावर झालेला दिसत नाहीये. या लूकमध्ये तो आणखीनच हॉट आणि गुड लूकिंग दिसतोय. त्याचा हा लूक लक्ष वेधून घेणारा आहे.
पुढील स्लाईडमध्ये पाहा, 'सुल्तान'चे दिग्दर्शक अली अब्बास जफर यांचे ट्विट...