आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनस्क्रीन आईवडिलांच्या आठवणींनी पाणावले सलमानचे डोळे, म्हणाला - जवळच्या लोकांना गमावले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः अभिनेता सलमान खानच्या आगामी ‘ट्यूबलाइट’ या सिनेमाचा ट्रेलर लाँच झाला. मुंबईत आयोजित या कार्यक्रमात सलमान खान सोहेल खान आणि सिनेमाचे दिग्दर्शक कबीर खान उपस्थित होते. सलमान यावेळी भावूक झालेला दिसला. दिवंगत अभिनेते  ओम पुरी, 'दबंग', 'दबंग 2' मध्ये सलमानच्या वडिलांची भूमिका साकारणारे विनोद खन्ना आणि 'साजन', हम साथ साथ हैं' या मालिकांमध्ये आईची भूमिका साकारणा-या अभिनेत्री रिमा लागू यांच्याविषयी बोलताना सलमान भावूक झाला आणि त्याचे डोळे पाणावले. 
 
सलमान म्हणाला - 'ट्यूबलाइट' टीजर आणि ट्रेलर बघणे एन्जॉय करु शकलो नाही..
- ट्रेलर लाँचवेळी सलमान म्हणाला, "मी टीजर आणि ट्रेलर बघताना एन्जॉय करु शकलो नाही. कारण मला यामध्ये ओम पुरी दिसत आहेत. आता ते आपल्यात नाही."
- "असे वाटते, की ते आताच माझ्या डोळ्यांपुढे होते आणि क्षणात आपल्यातू निघून गेले. त्यामुळे सिनेमाचा ट्रेलर, टीजर आणि गाणी ऐकून मन उदास झाले. अनेक वर्षे मी त्यांच्यासोबत काम केले आहे." 
- सलमान पुढे म्हणाला, "विनोद खन्नासुद्धा कमालीचे व्यक्तिमत्त्व होते. ते आमचे हीरो होते. तेसुद्धा आम्हाला सोडून निघून गेले."
- "रिमा लागू यांच्या निधनाविषयी समजेल, तेव्हा मी शूटिंग करत होतो. त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकून खूप दुःखी झालो."
- "गेल्या तीन ते चार महिन्यांतच मी माझ्या जवळच्या व्यक्तींना कायमचे गमावले. हा खूप दुःखद काळ आहे." 
- याचवर्षी 6 जानेवारी रोजी ओम पुरी त्यांच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळले होते. त्यानंतर 27 एप्रिल रोजी कॅन्सरमुळे विनोद खन्ना यांचे निधन झाले. 18 मे रोजी हृद्यविकाराच्या धक्क्याने रिमा लागू यांची प्राणज्योत मालवली. 

पुढील स्लाईड्सवर बघा, ट्रेलर लाँचवेळी क्लिक झालेली सलमान खानची 8 छायाचित्रे....
बातम्या आणखी आहेत...