आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Khan Hit And Run Case Judgement Day Today Mother Tensed

HIT AND RUN : सल्लूच्या डोळ्यात अश्रू, आई, बहिणींनाही फुटले रडू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(वडील आणि आईसोबत सलमान खान)

अभिनेता सलमान खान आणि त्याच्या कुटुंबीयांसाठी आजचा दिवस खूप वाईट आहे. हिट अँड रन प्रकरणी सलमानवरचे सर्व आरोप न्यायालयाने मान्य केले आहेत. याप्रकरणी सध्या कोर्टात युक्तीवाद सुरु आहे. न्यायाधीश डी. डब्लू. देशपांडे यांनी सलमानला तुला दहा वर्षांची शिक्षा होऊ शकते, असे म्हटल्यावर तो घामाघूम झाला आणि त्याने आपल्या वकिलाकडे पाहिले. सलमानचे सामाजिक कार्य बघून त्याला कमीत कमी शिक्षा व्हावी, असे त्याच्या वकीलांचे म्हणणे आहे.
दरम्यान, याबाबत जेव्हा कोर्टात सुनावणी सुरू होती तेव्हा सलमानच्या डोळ्यात अश्रू आले होते. त्याच अवस्थेत सलमान संपूर्ण कारवाई ऐकत होता. सलमानवरचे सर्व आरोप सिद्ध झाल्यानंतर सलमानची बहीण अलविरा खानला भर कोर्टातच रडू कोसळले. तर आई सलमा खान बेशुद्ध पडल्या. सलमानने आपल्या आईच्या माथ्याचे चुंबन घेतले आणि म्हणाला, ''अम्मी तुम्ही स्वतःची काळजी घ्या, मी लवकरच परत येईल.''
सलमानचा छोटा भाऊ सोहेल खान आणि माजी आमदार बाबा सिद्दीकी कोर्टाबाहेर पडले असून त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, न्यायालयाच्या दिशेने निघण्यापूर्वी क्लिक झालेली गॅलेक्सी अपार्टमेंटमधील सलमानची छायाचित्रे...