आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकालानंतर पहिल्यांदा दिसला सलमान, रात्री आईच्या गळ्यात पडून हमसून-हमसून रडला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- सलमान खान)
मुंबई- बहुचर्चित हिट अँड रन प्रकरणात बॉलिवूड अभिनेता सलमान खानला बुधवारी (6 मे) पाच वर्षांची शिक्षा झाली आहे. त्यानंतर बॉलिवूडकरांनी सलमानची भेट घेण्यासाठी त्याचे गॅलक्सी अपार्टमेंट गाठले. सलमानला कोर्टाने दोषी ठरवल्यानंतर कुटुंबीयांसह सर्व बॉलिवू़डसुध्दा धक्क्यात होते. सलमान शिक्षा सुनावल्यानंतर आज पहिल्यांदा घराबाहेर दिसला. काल रात्री (6 मे) स्टार्स सलमाला दिलासा देण्यासाठी त्याच्या घरी जमले होते.
सूत्रांच्या सांगण्यानुसार, 'रात्री घरी पोहोचल्यानंतर सलमान एक मिनिटांसाठीसुध्दा झोपला नाही. कोर्टाकडून त्याला दोन दिवसांचा जामीन मिळाल्यानंतर कुटुंबीयासह त्याचे सर्व मित्र परिवार त्याची प्रतिक्षा करत होते. यादरम्यान सलमान वडील सलीम खान आणि आई सलमा खान यांच्या गळ्यात पडून रडला. परिस्थिती पाहून बहिणी, कुटुंबीय आणि मित्र परिवारांनी त्याचे सांत्वन केले.'
'सलमानने घरी गेल्यानंतर जेवणदेखील केले नाही. तो आपल्या कुटुंबीय आणि मित्र परिवारांसोबत बसून राहिला. यावेळी लीगल टीमसोबत बसून त्याने पुढील योजनेविषयी बातचीत केली.' कोर्टात जाण्यापूर्वी सलमानने आईची गळाभेट घेऊन सांगितले होते, की तो लवकरच घरी येईल.
बातम्यांनुसार, 'आज सकाळी सलमानने काही वेळ विश्रांती घेतली आणि नाश्ता केला. तो आपल्या सिनेमा निर्मात्यांना भेटण्याची योजना करत असल्याचेदेखील सांगितले जाते. जेणेकरून अर्धवट राहिलेले सिनेमाच्या शूटिंगवर चर्चा करू शकेल. सलमानने तुरुंगात जाण्यापूर्वी आपल्या दोन्ही भावांना अरबाज आणि सोहेल खान यांना कुटुंबीयांची काळजी घेण्यास सांगितले.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सलमान खान आणि कुटुंबीयांची छायाचित्रे...