आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सलमानची आई हेलन यांचे B'day सेलिब्रेशन, प्रीती झिंटासह पोहोचले हे बॉलिवूड सेलेब्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केक कापताना हेलन, उजवीकडे - अभिनेत्री प्रीती झिंटा - Divya Marathi
केक कापताना हेलन, उजवीकडे - अभिनेत्री प्रीती झिंटा
मुंबईः अभिनेता सलमान खानची सावत्र आई हेलन यांनी सोमवारी त्यांचा 78वा वाढदिवस साजरा केला. अर्पिता खान हिने या बर्थडे सेलिब्रेशनचा एक फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या फोटोत हेलन केक कापताना दिसत आहेत. या फोटोत अलविरा त्यांच्यासोबत दिसतेय. हेलन यांच्या बर्थडे बॅशमध्ये मात्र सलमान, अरबाज आणि त्यांचे वडील सलीम खान अनुपस्थित होते. पार्टीत सोहेल खान मुलगा निर्वाण खानसोबत पोहोचला.
हेलन यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये झालेल्या छोटेखानी पार्टीत खान फॅमिलीतून अलविरा आणि अतुल अग्निहोत्री यांच्याव्यतिरिक्त प्रीती झिंटा, अर्पिता खान, आयुष शर्मा पोहोचले होते. हेलन यांचा जन्म 21 नोव्हेंबर 1938 रोजी म्यानमारच्या यांगून येथे झाला. हेलन यांनी 'हावडा ब्रिज' या सिनेमाद्वारे त्यांच्या करिअरला सुरुवात केली होती. त्यांनी फिल्म इंडस्ट्रीत 500 हून अधिक सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. 'इमान धरम', 'डॉन', 'दोस्ताना', 'शोले' या सिनेमांतील त्यांच्यावर चित्रीत झालेले आयटम नंबर आजही लोकप्रिय आहेत.

केमिओ रोलमध्ये झळकतात हेलन...
आता हेलन यांनी फिल्म इंडस्ट्रीला जवळजवळ अलविदा म्हटले आहे. अधूनमधून एखाद्या कॅमिओ रोलमध्ये त्यांचे दर्शन मोठ्या पडद्यावर घडत असते. बॉलिवूडचे प्रसिद्ध लेखक सलीम खान यांच्यासोबत 1981 मध्ये त्यांचे लग्न झाले होते. हेलन यांनी दत्तक घेतलेली मुलगी अर्पिता खानचे लग्न आयुष शर्मासोबत झाले आहे.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, हेलन यांच्या बर्थडे पार्टीत पोहोचलेल्या सेलेब्सचे फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...